एक शेर रसग्रहण
जाणले मी भोवताली मतलबी ही माणसे
वेळ आली सोबतीची,प्रश्न त्यांनी मांडले
गझलकारा अनिसा सिकंदर
अनिसाताईंच्या खास शेराचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
"हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमचे वागणे
माणसाने माणसाशी मानसासम वागणे"
अगदी आवडती माझी ही प्रार्थना आहे.
पण सभोवती पाहताना वाटते ,खरेच ही माणसे समोरच्यांपेक्षा आपण आपल्या तत्वाला धरुन वागतात की समोरचा अस्सा वागला !,मग मी पण तस्साच वागणार. असा विचार करतात की काय अशी शंका येवू लागते!
खरे तर वागणं ही माणसाची अनुभवातून ,संस्कारातून घडत असतं.समजत असतं की आपण या या वेळी,त्या त्या प्रसंगी कसं आणि का वागलं पाहिजे,कसं सामोरी गेलं पाहिजे.प्रसंगानुरूप माणसाचं वागणं बदलत असतं हे जरी खरं असलं तरी!तो अनुभवातुनच शिकत असतो,व्यक्त होत असतो हे मात्र खरं.
आणि यातुनच गझलकारा अनिसाताईंनी अनुभवलेय की ही सभोवतालची माणसे कशी मतलबी आहेत,ही खंत त्यांनी त्यांच्या या देवप्रिया वृत्तातल्या उला मधे व्यक्त केली आहे.
ज्यांना खरोखरी सोबत देण्याची,सोबत करण्याची वेळ आली तेव्हा या माणसांनी ती सोबतीची मदत करण्याऐवजी अनेकविविध प्रश्नच नुसते निर्माण केले.मदत करणे सोडून नानाप्रकारच्या त्यांच्या प्रश्नांना कसे सामोरे जावे हाच तर मला प्रश्न पडला. अशा अर्थीचा सानी गझलकाराताईंच्या शेरामधे दिसून येतो.
खरेच आज ही चिंतेची बाब आहे. आज माणुसकी नावाची चीज दुर्मीळ होत चालली आहे एवढे मात्र खरे.
प्रत्येकाच्या मदतीचे फंडे बदललेले आहेत.
काहीजण शो शा करण्यासाठी करतात,तर काहीजन आपल्या स्वार्थासाठी करतात,जसे राजकारणी. काहीजण आपले नाव ,प्रसिद्धी जाहिरातीसाठी करतात. तर काहीजण आत्मिय समाधानासाठी नेकी कर और दर्या में डाल, अशा उक्तीनुसार वागतात.यात स्वान्तसुखाय हा फारमोठा अर्थ असतो.ती व्यक्ती मग कोण काय म्हणेल,कोण पाहिल अथवा नाही याचाही विचार करीत नाही.हीच खरी सेवा.
आज सभोवती पाहताना हे सारे जग कसे अनेक रुपांनी भरलेले आहे याची जाणिव होते. हे जग म्हणजे खरोखरी रंगमंच आहे. इथे प्रत्यैकजन वेगवेगळ्या भुमिकेतून जगत असतो,मग ती भुमिका खरी असो वा खोटी.तो आपल्या इच्छेनुसार ती पार पाडतो. खरोखरी मनापासून त्या भुमिकेत जगणारा एखादाच असतो.तो ना कुणाच्या टाळ्यांची वा वाहवाची अपेक्षा करतो ना प्रसिद्धीची!
आणि ज्याला मनापासून मदत करायची आहे तो असे नानाप्रश्न शंका विचारत बसत नाही.तो स्वेच्छेने मदत करतो नि विसरून जातो.
अगदी आजचेच ताजे उदाहरण देतेय,
आज सकाळीच मी बेंगलोरला पोहोचले,मी व नवरा आम्ही दोघे माझ्या धाकट्या जावुबाईच्या तब्येतिसाठी ,भेटायला आलो. पाच ऑगष्टला तिचे लिव्हर ट्रान्सप्लान्टचे ऑपरेशन झाले,ईथे बेंगलोरला . तिची मुलगी आमची पुतणी गेली आठदहा वर्षे अमेरिकेत होती,पाच वर्षापुर्वी माझे दीर गेले, आईची तब्येत आणि एकटेपण यासाठी ती दोन वर्षापासून ईथेच आली .त्याच कंपनीने ईथे पोस्टींग दिल्याने तिलाही सारे सोपे झाले. वर्षापासून डाॅक्टरांनी सांगितल्यामुळे तिने आईचे ऑपरेशन इथल्या यच्चयावत उत्कृष्ट डाॅक्टरांच्या अंडर करण्याचे ठरवले.सुदैवाने पुतणीच्या मावसभावाचेच लिव्हर मॅच झाले.जो स्वताहा न्युरोसर्जन आहे.आणि त्याने ते दिलेही.पाच ऑगष्टला दोघांचेही नीट ऑपरेशन पार पडले.आज एकवीस दिवस झाले. दोघांचिही तब्येत उत्तम आहे.मात्र अजूनही माझी जाऊ मनाने खंबीर नाही,तिला नाना शंका आहेत मात्र हा डाॅक्टर भाचा इतक्या सर्व सोपस्कारानंतरही स्वताहा एवढा खंबीर आहे,की तोच मावशीला पदोपदी धीर देतोय तिला उभं राहण्यासाठी धडपड करताना मी पाहतेय.अगदी निर्वीकारपणे,चेहर्यावर कसलाही भाव हसण्याव्यतिरिक्त न ठेवता धीर देतोय.
खरोखरीच माझं मन भरून आलं! असं उदाहरण मी समोर पाहतेय खरोखरी पुर्वजन्मीचे संचितच वाटते. अशी मावशी अन् असा भाचा.त्याचे वडील आठ वर्षापुर्वी गेले,आईला जावून दीड वर्षच झाले.एकटा अजून सर्जरीज करतो काम करतोय तरी त्याने हा निर्णय हसतमुखाने घेतला.
हे आम्हा कुटूंबासाठी केवढी भाग्याची गोष्ट.अशी उदाहरणे विरळाच असतिल पण आपल्या जवळचेच उदाहरण पाहुण कौतूकआणि अभिमानही वाटतोय.
तिची प्रगती होणारच आहे.मनाने थोडी साशंक आहे. साहजिकच आहे बारा तासांच्या ऑपरेशननंतर सोळा सतरा दिवस आय सी यू मधे राहिल्यानंतर पेशंटची अशी अवस्था होतच असते.येईल ती त्यातुन बाहेर लवकरच! आम्ही प्रयत्न करूच.
तर गझलकारा अनिसाताईंच्या अनुभवात त्यांनी मदतिशिवाय नानाप्रश्नांनी त्रास देणार्यांना जास्त पाहिलेलेच लोक असतिल हे त्यांच्या शेरातून दिसून येते. हेही खरेच आहे.मीही असे बरेच लोक पाहिलेले आहेत.
मी तर आमच्या गावी,माहेरी,आताच्या गावातही अशीच,स्वार्थासाठी जवळ करणारी माणसेच जास्त पाहिली आहेत. त्यात सर्व क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत.
सुदैवाने मी काही क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेतला आहे. उदा.... कला शिक्षीका असल्याने त्याही क्षेत्रात,अ.नि.स, को.म.सा.प, भ्र.नि.स, भा.ज.प, विज्ञान भारती अशांची सभासद असल्याने बरेच चांगले वाईट अनुभव गाठीशी आहेत.
त्या आणि अशाच अनुभवातून गझलकारा अनिसाताईंचा अनुभव त्यांच्या शेरातुन प्रकट झाला आहे यात काही वाद नाही.
पण शेवटी आपण आपले,कर्मण्येवाधिकारस्ते,मा फलेशु कदाचन् या उक्तीफ्रमाणे आपण आपले राहावे. बस्स!
सभोवतालचे मतलबी लोक पाहिले की त्रास होणं साहजिकच आहे. पण आपणही आपले मन खंबीर करावे.ज्या हाताने देतो तो त्याच हाताने घेत असतो हे मात्र नक्की. तेव्हा फार विचार नाही करू!
जो जे वान्छील ते तो लाहो.... प्रमाणे चालावे हेच ठीक. "जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे,निराधार आभाळाचा तोच भार वाहे!"
दूःख कशाचे करावे? काट्याचे की गुलाबाच्या सुवासाने आनंदित व्हावे! आपणच ठरवायचे!
आज अनिसाताईंचा शेर खूप काही विचार करायला लावणारा ठरला. अगदी खरे आहे ताई. पण आपण या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे.म्हणजे... सुख पर्वताएवढे आणि दूःख जवा एवढे वाटू लागेल.
निशा दळवी , बेंगलोर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा