सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर अण्णांच्या अर्धाकृती पुतळ्याची तसेच प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी आठ वाजता शाळा समिती सदस्य तथा माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील जाधव, रेश्मा शेख, सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव जाधव व छाया जाधव, पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांच्या हस्ते कर्मवीर रथाचे पूजन होऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. यामध्ये विद्यालयातील जवळपास ७०० विद्यार्थी सहभागी झाले. झांज पथक, लेझीम पथक व टिपरी नृत्य मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. विद्यालयातून निघालेली मिरवणूक रामवेस, पोरा पोरांची चावडी, आंबेडकर चौक, नेहरू चौक, खडकपुरा, नगरपालिका, चाळीस फुटी रोड, दर्गा मज्जिद चौक, संभाजी चौक मार्गे परत विद्यालयात दाखल झाली. यावेळी कर्मवीर आण्णा यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका राजश्री मखरे व प्रा. अशोक मखरे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, विकास शिंदे, प्रवीण ननवरे, तसेच जागोजागी माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक यांनी कर्मवीरांना अभिवादन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या व रयत शिक्षण संस्थेच्या घोषणा देऊन इंदापूर शहर दुमदुमून सोडले. मिरवणुकीनंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व महिला बचत गटाच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले. माजी नगराध्यक्ष कै. धनंजय वाशिंबेकर यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा