इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
खडकी ( पुणे ) शिक्षण संस्था संचलित टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान ( स्वायत्त ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवाशी जैन कॉन्फ्रेन्स मुंबई, पुणे पंचम झोन व राष्ट्रीय महिला शाखा यांच्या वतीने 'आदर्श प्राचार्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते तसेच ज्योती सोळंकी, कल्याण गंगवाल, प्रा. सुरेखा कटारिया व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देवून प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात
सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य डॉ. चाकणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगल्भ दृष्टीकोन व दूरदृष्टी दाखवून महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. महाविद्यालयास नॅक अ श्रेणी, स्वायत्ततेचा दर्जा मिळवून दिला आहे, संशोधन व नवनविन उपक्रमांस चालना देणे, पेटंट प्राप्ती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन, विविध समाजाभिमुख उपक्रम राबविणे, विद्यार्थी केंदबिंदू मानत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आदी विविध क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व, समाजोपयोगी कार्यावर भर, सतत नविन्याच्या ध्यास असणारे आधुनिक शैक्षणिक धोरण या सर्व गुणांमुळे त्यांची आदर्श प्राचार्य म्हणून ओळख आदर्शवत झाली आहे. हा सन्मान त्याचेच द्योत्तक आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, “प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचे शैक्षणिक नेतृत्व व विद्यार्थी हितासाठीचे प्रयत्न हे प्रेरणादायी आहेत. त्यांचा हा सन्मान म्हणजे शिक्षण क्षेत्राचाच गौरव आहे.”
संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांना मिळालेल्या पुरस्कारा मुळे महाविद्यालयाचा देखील मानसन्मान उंचावला आहे. डॉ. चाकणे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
सत्कारमूर्ती डॉ. संजय चाकणे म्हणाले, या पुरस्काराने केवळ एका प्राचार्याचा गौरव झालेला नाही, तर खडकी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा देखील सन्मान झाला आहे. मिळालेला हा सन्मान संपूर्ण महाविद्यालयीन परिवारासाठी प्रेरणादायी आहे. मिळालेल्या पुरस्कारा मुळे माझ्या जबाबदारीत आणखी वाढ झाली आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. चाकणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा