Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

सोलापूर जिल्ह्यास वरदायिनी ठरलेल्या पाण्याचे योग्य नियोजन हवे-- आमदार रणजितसिंह मोहिते पाटील


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता १२१ टीएमसी असून धरणात ६० टीएमसी मृत साठा तर उर्वरित चल साठा आहे. उजनीतील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.

उजनी धरण लाभक्षेत्रा तील मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांशी दिनांक १२ सप्टेंबर रोजी मौजे कामती येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार मोहिते पाटील बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला.



आमदार श्री. मोहिते पाटील पुढे म्हणाले,

या धरणावर सुमारे १०० हून अधिक गावांच्या पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. आता यात आणखी वाढ करण्यात येणार असून पुढील वर्षी उजनीतील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात जाणार आहे तसेच डिसेंबर महिन्याच्या अखेरीस २ टीएमसी पाणी घाटणे बंधाऱ्यात जाणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणातील पाण्याचा तुटवडा वाढतच जाणार आहे. त्यातच उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता जास्त असली तरी धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. धरणात किमान ५१ हजार कोटी रुपयांचे काळे सोने म्हणजे वाळू आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यास देखील मर्यादा येणार आहेत. उजनी धरण ते सोलापूर शहर समांतर जलवाहिनीचे काम सध्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे भीमा नदीला व कालव्याला पाणी सोडण्यासाठी मर्यादा येणार असून पाण्याची पळवापळवी रोखण्या साठी आता शेतकऱ्यांना उजनीचे पाणी आरक्षित करण्यासाठी सजग रहाणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणीवापर संस्थांची नोंदणी करणे ही काळाची गरज बनली आहे. पाणी नियोजना साठी आता शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असून आपण सदैव शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

यावेळी वसंतनाना देशमुख, मनोहरभाऊ डोंगरे, बाबासाहेब क्षीरसागर, अनिल सावंत, राजशेखर पाटील, अस्लम चौधरी, विनय पाटील, दीपक गायकवाड, सीमाताई पाटील, मानाजी बापू माने, मौजे कामतीचे सरपंच प्रवीण भोसले, डॉ. सर्वळे, अच्युत पाटील, रणजीत चवरे, ॲड पवन गायकवाड, विजय कोकाटे, विजय बुरकुल, शिवशंकर कवचळे, भारत पाटील, काशीनाथ पाटील, रवी पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा