संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
बारूळ ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रशासकीय बदलीमुळे बदलून गेलेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ व नवीन शाळेमध्ये आलेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.
. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून बारूळ गावचे सरपंच शहाजी सुपनार हे होते. सुरुवातीला धाराशिव जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आम्ही मुलांनी व सरोजनी जाधव यांचा बारूळ ग्रामस्थ व शाळेच्या वतीने शाल,भेटवस्तू, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेमध्ये नव्याने रुजू झालेल्या तुळजापूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन राऊत,पोपट शिंदे, राजकुमार मस्के यांचेही स्वागत शाल, फेटा बांधून करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सुरजनी जाधव यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा सांगितला व त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी सुधारली हे सांगितलं.अमिन मुलाणी सरांनी शाळेची तालुक्यांमध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमामध्ये द्वितीय क्रमांक व जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळवण्यामध्ये शाळेने केलेल्या प्रगतीचा आलेख सांगितला. शाळेला गावाचा आधार असेल तर शाळेचा विकास होतो हे बारूळ गावच्या उदाहरणाद्वारे दिसून येते. शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते प्रति जागरूक असतील तर शाळेची कशी प्रगती होते हेही त्यांनी अधोरेखित केले
.शेवटी उपस्थितांचेआभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सौदागर शेख,शिक्षक बालाजी पवार,रुपाली गडेकर, कल्पना चव्हाण, शीतल वाघमारे,नबीलाल शेख, सरपंच शहाजी सुपणार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मन्मथ ठोंबरे, उपाध्यक्ष सुधीर लांडगे, रणजित सगर, युवराज वट्टे, रतन मुदगुडे, पोलीस पाटील शिवाजी सगर, संजय ठोंबरे, सुनिल नवगिरे, राजकुमार वट्टे,गणपती कुंभार यांनी सहकार्य केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा