कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कै. नारायण त्रिंबक कोरांटक गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार सुरेखा नंदकुमार पाटील यांना प्रदान करण्यात आला. पाटीलवस्ती, गिरवी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत.
नीरा नरसिंहपूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका भाग्यश्री दंडवते यांच्या हस्ते, ह.भ.प. अंकुश रणखांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार मगनदास क्षीरसागर, संचालक शामराव दंडवते, प्रशाला समितीचे अध्यक्ष धनंजय दुनाखे, प्राचार्य गोरख लोखंडे, प्रशाला समितीचे सदस्य अमोल कोरांटक, नंदकुमार पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - सुरेखा नंदकुमार पाटील
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा