Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

पत्रकार घरकुल योजना- साठी "पत्रकार सुरक्षा समिती "आग्रही विभागीय आयुक्त पुणे यांची भेट घेऊन केले निवेदन सादर


 

माळशिरस तालुका-- प्रतिनिधी

 रशिदभाई शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्य माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जप आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार चे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारानी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक 18/6/2025 रोजी निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतः च्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना संदर्भात योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना हक्काचा निवारा मिळवून देण्याची मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे केले असून पत्रकारांच्या घरकुल योजना बाबत सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती केली आहे 

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव अरुण सिडगीड्डी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा