सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
प्रतिबंधीत मांगुर माशाचे बेकायदेशीर पालन व त्यांची तस्करी करुन, शासकीय आदेशाचा भंग करून पर्यावरणास घोका निर्माण केल्याच्या कारणावरुन कालठण नं. १ येथील अक्षय राजेंद्र पाडुळे याच्यावर इंदापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
हडपसर मत्स्यबीज केंद्राचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र रूपचंद राठोड यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
दि.२२ सप्टेंबर रोजी रात्री पोलीस आपत्कालीन क्रमांक ११२ च्या मशीनवर कालठण नं. १ येथील अक्षय राजेंद्र पाडूळे हा त्याचे घरासमोर रस्त्या वर दोन पुरुष व एक महिला मांगुर माशाची तस्करी करत असल्याचा कॉल आला. या कॉल ची दखल घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे नंदू जाधव व वाहन चालक गिरी हे कालठण नं.१ मध्ये गेले. त्यावेळी तेथील काळभैरवनाथ मंदिराजवळ अक्षय पाडुळे हा विना क्रमांकाच्या हिरव्या रंगाच्या जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी प्रतिबंधीत केलेल्या मांगुर जातीच्या माश्यांची बेकायदेशीर पणे वाहतूक करत असताना त्यांना आढळून आला.
हडपसरचे मत्स्यबीज व्यवसाय केंद्र व इंदापूर पोलीस ठाण्याकडून त्याला या आधी ही बेकायदेशीर मांगुर मत्स्यपालन करू नये असे लेखी पत्राद्वारे कळवून देखील शासकीय आदेशाचा भंग करुन त्याने पर्यावरणास घोका निर्माण केला. हे मासे खाण्याने लोकांना गंभीर आजार होणार असल्याची जाणीव असताना हा प्रकार त्याने सुरुच ठेवल्याच्या कारणावरुन पाडुळे याच्यावर भा.न्या.सं.
कलम २२३ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ चे कलम ५९ व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ३,५ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सचिन बोराडे अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व मांगुर माशांची नगरपरिषदेच्या कचरा डेपोत खड्डा घेऊन विल्हेवाट लावण्यात आली आहे.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भीमा नदी काठी भिगवण ते कांदलगाव परिसरात प्रतिबंधित मांगूर माश्याचे पालन करून तिथे पंकज मासे पालन केले जात असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र मत्स्य पालनासाठी त्यांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याने यामध्ये अनेक अर्थपूर्ण घडामोडी होत असल्याचे उघड गुपित आहे. त्यामुळे फक्त पाडुळे वरच का कारवाई, मोठे मासे कधी गळाला लागणार अशी चर्चा या कॉल कारवाई नंतर सर्वत्र रंगली आहे.
फोटो ओळी : बेकायदेशीररीत्या पालन व वाहतूक होत असलेला पोलीसांनी जप्त केलेला प्रतिबंधीत मांगुर मासा.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा