Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

वकीलवस्ती ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मुमताज शेख यांची बिनविरोध निवड


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- वकीलवस्ती (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुमताज अब्दुलगणी शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रोहन कोळेकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने उपसरपंचपदी मुमताज शेख यांची निवड करण्यात आली. सरपंच वनिता भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांनी कामकाज पाहिले. वकिलवस्ती ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी मुमताज शेख यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे मुमताज शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सदानंद कोरटकर, उदय घोगरे, रोहन कोळेकर, अतुल सरवदे, वर्षा धुमाळ, विजया सरवदे, शीतल भोसले, स्वाती खंदारे उपस्थित होत्या. निवडीनंतर मुमताज शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब भोसले, सरपंच वनिता भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



फोटो - उपसरपंच मुमताज शेख

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा