इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील उर्फ भाऊ यांनी इंदापूर तालुक्यात कृषीधवल सहकार व शैक्षणिक क्रांती केली. त्यामुळे ते तालुक्याचे भाग्यविधाते आहेत असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील उर्फ भाऊ यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवार, मान्यवर संस्थेचे संचालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी देखील अभिवादन केले.
यावेळी समाधीस्थळा वर नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे देशपातळी बरोबरच महाराष्ट्र तसेच इंदापूर तालुक्यामध्ये कृषी, सहकार, शिक्षण, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे कार्य आहे. त्यामुळे ते तालुक्याच्या कृषीधवल सहकार औद्योगिक क्रांतीचे आद्य प्रणेते आहेत. त्यामुळे ते कर्मयोगी असून त्यांच्या कार्याचे संवर्धन करणे म्हणजेच त्यांना विनम्र अभिवादन करणे होय.
यावेळी संस्थेचे संचालक ॲड. मनोहर चौधरी, विलासराव वाघमोडे, तुकाराम जाधव, सुभाष काळे, माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील व प्रा. कृष्णा ताटे, माजी नगरसेवक शेखर पाटील व कैलास कदम, इंदापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष मनोज मोरे, संचालक मच्छिंद्र शेटे, अविनाश कोथमीरे, ज्येष्ठ कार्यकर्ते निलेश देवकर, मेघ:शाम पाटील, सागर गानबोटे, दादा पिसे, नितीन मखरे, ललेंद्र शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा