इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
दिनांक ६ सप्टेंबर रोजी इंदापूर येथील डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रतिष्ठानच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी (महंमद पैगंबर जयंती) निमित्त स्त्री जन्माचे स्वागत करून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा संदेश देण्यात आला. इंदापूर शहरा तील डॉ. रोहिदास थोरवे, डॉ. वंदना थोरवे, डॉ. अतुल वणवे, डॉ. प्रतिभा वणवे, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. कल्पना खाडे, डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. ज्योती नरुटे यांचे हॉस्पिटल तसेच उपजिल्हा रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले. यावेळी जन्मलेल्या मुलींना ट्रॉली पाळणा, बेबी किट व बाळाच्या मातेला साडी, ब्लाउज, पेढे देऊन स्त्री जन्माचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲड. ईनायतअली काझी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुला मुलींचा जन्मदर समतोल राखण्यासाठी असे उपक्रम प्रत्येक गावागावात, जिल्ह्यात, राज्यात व देशात राबवणे ही काळाची गरज आहे. केवळ मुलगाच आपला सांभाळ करेल हे समाजात असलेली चुकीची कल्पना थांबवण्याची गरज असून मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे.
यावेळी भरतशेठ शहा म्हणाले, प्रेषित मोहम्मद यांनी १४०० वर्षांपूर्वी जो सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे त्याचे आजही मुस्लिम समाज व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रतिष्ठान पालन करीत असून त्यांचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुशीरखान पठाण म्हणाले, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी महिला,स्त्री जन्माबाबत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वावर चालण्याची गरज असून मुली, युवती, महिला यांचा योग्य मानसन्मान ठेवणे ही काळाची गरज आहे.
यावेळी जाकीर काझी, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, प्रा. अशोक मखरे, चांद पठाण, महबूब मोमीन, आयन जमादार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अल्ताफ पठाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड. अक्रम शेख, निहाल काझी, असलम शेख, सिकंदर बागवान, श्रीकांत मखरे, अली मनेरी, इरफान शेख, अलीम मनेरी, विकास शिरसागर, अहमद रजा सय्यद, युनुस मनेरी, असगर बेपारी, मुजीब पठाण, अशरद सय्यद, रियाज बागवान, फिरोज पठाण, मुन्ना बागवान, वाहिद पठाण, सैफ काझी, अजय साळुंखे, अयान बागवान, जमीर सय्यद, मुजीब शेख यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा