इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व सहकाऱ्यांचा डास निर्मुलनाचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण राज्यात गेला. त्याचे कौतुक राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटवार यांनी केले. या आरोग्य केंद्राने १०० दिवसात लक्षवेधी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेवून या केंद्राचे विशेष पत्रा व्दारे अभिनंदन केले. त्यामुळे इंदापूर तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यात झाला. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरोग्य केंद्र बिजवडी, काटी आणि शेळगावच्या २०० कर्मचाऱ्यांच्या यशोगाथेचा आयुष्मान आरोग्यदूत गौरव सोहळा इंदापूर येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला. तत्पूर्वी समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निमगाव केतकी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन सुशोभीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण डोंगरे, देवराज जाधव, डॉ. सुदर्शन दोशी, लक्ष्मीकांत जगताप, शशिकांत तरंगे, शिवाजी तरंगे, सचिन सपकळ, अतुल झगडे, बाळासाहेब हरणावळ, लक्ष्मण देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, डॉ. श्रेणिक आणि डॉ. संदेश शहा यांच्या घराण्याचा समाजसेवेचा वारसा डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा संवर्धित करत आहेत. त्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेतल्याने उत्तरोत्तर आशीर्वाद मिळत गेल्याचे मंत्री भरणे यांनी आवर्जून सांगितले.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, आरोग्य सचिव निपुण विनायक, राष्ट्रीय साखर महासंघा चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड चे अध्यक्ष किशोरभाई शहा आदींनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तर जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविणभैय्या माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, जिल्हा प्रकल्प संचालक मृदुला होळकर, इंदापूर तालुका गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, विस्तार अधिकारी संतोष बाबर आदी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा पुरस्काराची पार्श्वभूमी विशद करताना म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या ४ वर्षात यशस्वी राबविलेल्या विविध शासकीय योजना, ८०० हून अधिक निर्विघ्न संपन्न कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, १९ उपकेंद्रांची दफ्तर तपासणी, आधुनिक रोबोटद्वारे स्वच्छता, सुरक्षित मातृत्व अभियान, सुदृढ बालक उपक्रम, १०० हून अधिक संस्थात्मक प्रसूती, ६० हजार हून अधिक वार्षिक बाह्य रुग्ण सेवा, बाळांचे लसीकरण, गृहभेटी इत्यादी उपक्रमामुळे जिल्ह्यात तर डास निर्मूलन प्रकल्पामुळे आम्ही राज्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून सत्कारासाठी प्रियंका संदेश शहा यांनी नैसर्गिक डिंकापासून मेडल तयार करून या कार्यक्रमाची रंगत वाढविली तर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे कौतुक केल्याने आम्हा सर्वांची जबाबदारीत वाढ झाली आहे.
चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी चरणसिंह बडगुजर, इंदापूर शाखेचे पूर्वल मेहता, धनंजय माने, सचिन कांबळे, अजय सोनवणे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. गणराज चौगुले, देवेंद्र उत्तेकर, प्रवीण क्षीरसागर, प्रदीप गोलांडे यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा