अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ६५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सुरु होऊन उत्साहात पार पडली.सभेपुढे मांडण्यात आलेल्या सर्व १३ विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, शासन ऊसाच्या उपलब्धतेचा अभ्यास न करता नव्या कारखान्यांना उभारणीसाठी तर जुन्या कारखान्यांना विस्तार वाढीसाठी परवानगी देत आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या काळात दराची स्पर्धा सुरु होऊन ऊस पळवा पळवी वाढीस लागलेली आहे. आपला सहकार महर्षी कारखाना आता कर्जमुक्त झालेला आहे. त्यामुळे आपण यावेळी जिल्ह्यात सर्वाधिक दर देणार आहोत.त्यामुळे सभासदांनी पूर्ण क्षमतेने या कारखान्याला आपला ऊस घालवा असे अवाहन केले.
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले की,
सरकारने सन २०१९ साली साखरेचा ३१०० रुपये दर ठरवून दिला होता.तो अद्यापही तसाच आहे.तो दर वाढवून ४१०० रुपये करावा.इथेनोलच्या दरात ६ ते ७ रुपयानी वाढ करावी अशी मागणी आता सगळ्यांकडून होत आहे.
चालू पावसाळ्यामध्ये नीरा नदीतून ६१ तर उजनीमधून १५० टी एम सी पाणी वाहून गेले आहे.उजनी धरणाच्या एकूण क्षमते एवढे पाणी आपल्याला नदीतून सोडून द्यावे लागले.पुणे,पिंपरी चिंचवड शहराला वाढीव पिण्याच्या पाण्याची मागणी होत आहे.उजनीतून मराठवाड्याला खूप मोठया प्रमाणात पाणी दिले जाणार आहे.त्यामुळे भविष्यात आपल्यावर पाण्याच्या ओढातानीची वेळ येणार आहे.त्यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यावर आपला अधिकारी सांगण्याची वेळ आता आली आहे.आता गप्प बसून चालणार नाही.सर्वांनी आता पाणी वापर संस्थांची नोंदणी करणे गरजेचे झाले आहे तरच भविष्यात आपल्याला पाणी मिळेल.
यावेळी गत हंगामात ऊसाचे दर्जेदार उत्पादन घेतलेल्या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील,अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौघुले, सर्व आजी माजी संचालक,कामगार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रचंड झालेल्या पावसामुळे माळशिरस तालुक्यातील शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा असा ठरावही करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा