Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

पुणे विमानतळावर खळबळ जनक घटना -राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानसभा लढवलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या बॅगेत आढळले रिव्हाल्वर व पाच काडतुसे


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

Revolver in Bag पुणे : पुणे विमानतळावर माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३, रा. गादेगाव, पंढरपूर) हे पुणे ते वाराणसी या विमानाने प्रवास करणार होते. विमान प्रवासापूर्वी सुरक्षेअंतर्गत त्यांची बॅग स्कॅनरमधून तपासण्यात आली.


त्या वेळी सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. तत्काळ ती जप्त करण्यात आली. बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.


या घटनेनंतर विमानतळ पोलिस ठाण्यात बागल यांच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत त्यांच्या परवान्याची मुदत केवळ महाराष्ट्रापुरतीच असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा