अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
संग्रामनगर दि.०२ (प्रतिनिधी)
माळशिरस तालुक्यातील माळखांबी या छोठ्याशा गावातून मुंबई येथील मराठा अंदोलकांना खरडा,भाकरी, चपाती,धपाटे,लोणचेची शिदोरी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पोहोच करण्यासाठी आज गोळा करून वाहनाने मुंबईकडे पाठवण्यात आले.एक घर एक शिदोरी याप्रमाणे शिदा देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिदोरी गोळा करण्यात आली.
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे.त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईला गेले आहेत. त्यांच्या जेवण्याची सोय करणे शक्य नसल्याने सामाजिक संस्था, गावातील घरोघरी अंदोलकांना जेवणासाठी सकल मराठा समाजातील महिलांनी शिदोऱ्या बनवून दिल्या आहेत.भाकरी, धपाटी,चटणी,खरडा,लोणचे,फळे, पाणी व्यवस्थित पॅकींग करून मुंबई कङे पाठविण्यात आला.माळखांबी येथील ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने शिदोरी गोळा करून पाठवण्यात आली.एक घर एक शिदोरी या संकल्पनेनुसार आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार भाकरींची शिदोरी घेऊन वाहन मुंबईला आज रवाना झाले. यावेळी अमोल शेळके पाटील, दिपक गमे पाटील,गणेश शेळके पाटील,बिभिषन गमे पाटील,अमोल गमे पाटील,मनोज शेळके पाटील,जिजाऊ बिग्रेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षा शिवमती शारदा चव्हाण,सिध्देश्वर शेळके पाटील व निलेश चव्हाण व सकल मराठा समाज माळखांबी यावेळी उपस्थित होता.तर विजयकुमार शेळके पाटील यांनी पिकॶपला डिझेल देवून मराठा आंदोलनातील समाज बांधवाना शिदोरी पाठविण्याचे काम केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा