Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मुस्लिम बांधवांची सर्वतोपरी मदत...


 

इकबाल बाबासाहेब मुल्ला

(ज्येष्ठ पत्रकार) सांगली

मो :-- 8983 587 160

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांनामुस्लिमांची बांधवांची सर्वोतोपरी मदत करत असून ही आपल्या देशाची संस्कृती आहे !

"जातीपातीच्या भिंती" *पुरोगामी* भारतात , महाराष्ट्रात कधी नव्हत्याच, केवळ राजकीय स्वार्थासाठी *जातीयवादी* पक्षांनी त्याचे *भीतीदायक* चित्र उभे करून *सत्ता* हस्तगत केली आणि माझ्या मराठा - हिंदू बांधवांना नेहमीच *भीतीच्या* छायेत ठेवले आणि *सत्तेचे लोणी* खाल्ले.आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत भारतीय *मुस्लिम* प्रामाणिकपणे मराठ्यांच्या सोबत *लहान भाऊ* या नात्याने उभा आहे. *भाकरी, खर्डा* ,लोणचे, कालवण, पाणी, *जेवण*, नास्ता, राहण्यासाठी हॉटेल्स असे जीवनावश्यक सर्वकाही देत हिंदू - मुस्लिम "भाई भाई " हा नारा *दुमदुमत* ठेवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून, मुंबई ,पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर,मालेगाव आणि सर्वच जिल्ह्यातून *ट्रक-टेम्पो* भरून सर्व सामान मुंबईच्या दिशेने जातं आहेत. *सर्वधर्मसमभाव* आज खऱ्या अर्थाने "सार्थ" आणि "सिद्ध" होत असून तमाम "जातीयवाद्यांना" ही सणसणीत "चपराक" आहे.

   *भाजप मधील हिंदुचे योगदान कधी ??*

भाजप पक्षात असणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा मराठा आरक्षणाला *पाठींबा* आहे की नाही ?? का मराठा *आरक्षणाला* भाजप किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा *विरोध* आहे ?? कारण मराठा समाजाच्या अस्मितेसाठी आज *मनोज जरांगे* हे "प्राणपणाने" लढत आहेत,त्यांच्या लढ्यासाठी आरक्षणाच्या "लढ्याच्या" पहिल्या दिवसापासून मुस्लिम समाज "अग्रस्थानी" असताना,आज आरक्षणासाठी संपूर्ण "मराठा - हिंदु" बांधव एकत्र येणे ही "काळाची गरज" असताना, राजकीय स्वार्थ आणि *पक्षाच्या धोरणाविरुद्ध* भाजप मधील हिंदु जायला तयार नाही. मराठा समाजाविषयी इतकेच "प्रेम" असेल तरी *पक्षीय वस्त्रे* बाजूला ठेवत भाजपा पक्षातील सम्पूर्ण कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एकत्र यावे, "पुढाकार" घ्यावा आपले योगदान द्यावे.

 *केवळ मतांसाठी मराठा लागतात का ?*

*भाजपाला* केवळ निवडणुकीत "मते" मिळण्यासाठी *मराठा* हवे आहेत का ?? मराठा आज "मरत" आहे,आरक्षणाची नितांत गरज आहे.परंतु "सरकार" *वेळकाढूपणा* करत मराठ्यांच्या *सहनशीलतेचा* अंत पाहत आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी मराठ्यांच्या *खांद्याला खांदा* लावत मराठा आरक्षणाच्या लढाईत आपले योगदान द्यावे.

*मुंबईत* आमरण उपोषणाच्या लढाईत *मुस्लिमांचे योगदान* आणि सर्वोतोपरी मदत आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात *कौतुकाचा* विषय ठरली आहे.



 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा