इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणी देवकर येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्रात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत इंदापूर येथील मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्राने निर्विवाद वर्चस्व राखीत, एकूण १८ विविध वजन गटात प्रथम क्रमांक तर चार विविध वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवून सुयश संपादन केले.
इंदापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे संस्थापक अमोल तोरवे, राष्ट्रीय कुस्ती पंच शरद झोळ यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत अनेक प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या. मल्ल्यांच्या डाव, प्रतीडावास उपस्थितांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. मारकड कुस्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच मारुती मारकड यांनी सर्व यशस्वी मल्लांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
इंदापूर मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील मल्लांनी १४ वर्षे वजन गटात पृथ्वीराज जाधव याने ३५ किलो, यश संतोष मारकड याने ४१ किलो, ऋतुराज सुधीर काळे याने ४८ किलो, हर्षल युवराज मारकड याने ६८ किलो, यशराज श्रावण चोरमले याने ७५ किलो, हर्षद श्रावण चोरमले याने ५७ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.
१७ वर्षे फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात राजवर्धन संदिपान शेंडगे याने ४५ किलो, समर्थ रामचंद्र पेटकर याने ५५ किलो, सार्थक संतोष मारकड याने ७१ किलो, समर्थ शत्रुघ्न शिंदे याने ८० किलो, अनिकेत आबासो चोरमले तर १९ वर्षे फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये रोहित दिलीप दंगाणे याने ७४ किलो याने प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच १७ वर्षे ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत तेजस भारत गोफणे यांनी ५५ किलो, पृथ्वीराज हनुमंत मारकड याने ५१ किलो, माऊली राजेंद्र कचरे याने ७१ किलो तर
१९ वर्ष वयोगटात आदित्य सुभाष पिंगळे याने ६३ किलो, विशाल विजय कारंडे याने ८२ किलो, यशराज सचिन जाधव याने १३० किलो, अवधूत व्यवहारे याने ६७ किलो, गणेश धोंडीराम मासाळ याने ७२ किलो यांनी व्दितीय क्रमांक मिळवले. सर्व विजेत्या कुस्तीगीरांना पंचकृष्णा मोबाईलचे प्रोप्रायटर ॲड. मोरेश्वर कोकरे यांच्यातर्फे प्रत्येकी एक हजार रुपये रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा