इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
राष्ट्रीय सब ज्युनिअर कुराश स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने दोन गटात स द्वितीय व तृतीय चॅम्पियनशिप पटकावून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दिनांक १० ते १२ सप्टेंबर रोजी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय कुराश स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या ५५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये या संघाने सात गोल्ड, दोन सिल्वर व बारा ब्रांझ मेडल्स मिळवून ग्रुप वन मध्ये तृतीय चॅम्पियनशिप व ग्रुप तीन मध्ये व्दितीय चॅम्पियनशिप मिळवून महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशामध्ये गाजवले.
कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमधून या खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली होती. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, सहसचिव दत्तात्रय व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे पंच म्हणून श्रुती पुनगावकर, शरद अंदुरे अनिकेत व्यवहारे यांनी काम पाहिले तर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कोच म्हणून संजय पाटील, अमित ठाकूर, शुभम दातरंगे व माया कदम मॅडम यांनी काम पाहिले.
विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे आहेत.
गोल्ड मेडल : श्रावणी सूर्यवंशी, सांस्कृतिक टोणपे, जया कांबळे. वैष्णवी कोतपल्लीवार
,विराट करंजुले. युद्धवीर गायकवाड. शौर्यजीत साळुंखे.
सिल्व्हर मेडल :जान्हवी तुर्कमाने.
ब्रांझ मेडल : शिवानी सूर्यवंशी, अंकिता धोत्रे. अन्वी गायकवाड, सिद्धी दातरंगे, स्वरा डहाळे, आदित्य शिंदे, लावण्या होले, आराध्या जाधव, वेदांत कुटे, वेदांत सुरवसे.
सर्व विजयी खेळाडूंचे इंदापूर हेल्थ क्लब चे विश्वस्त भरतशेठ शहा व मुकुंदशेठ शहा यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा