Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

शिक्षकांनी संस्कारक्षम शिक्षण देऊन भावी पिढी घडवावी--- खासदार प्रणिती शिंदे* *उत्तर सोलापूर तालुका उमेश कमिटीचा उपक्रम १५ आदर्श शिक्षकांचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सन्मान


संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे देशाचे माजी गृहमंत्री व काँग्रेस नेते श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आदर्श शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.


यावेळी आपले विचार व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नाही, तर संस्कारक्षमणे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे आणि ती भूमिका शिक्षकांनी पार पाडावी. आजच्या पुरस्काराने शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचा सन्मान करण्याचे कार्य उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीने केले आहे. येणाऱ्या काळात तुमच्या हातून ज्ञानार्जनाचे कार्य सातत्याने घडत राहो, हीच अपेक्षा. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असून याबाबत विचारमंथन होणे गरजेचे आहे. सोलापूर शहरात लवकरच शिक्षकांसाठी एक दिवसाचे चर्चासत्र घडवून आणून याबाबत सखोल चर्चा करण्यात येईल.



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. राजीव दबडे यांनी भूषविले.

याप्रसंगी संयोजक उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “उत्तर सोलापूर तालुक्यातील खऱ्या अर्थाने भूमिपुत्र असणाऱ्या शिक्षकांचा गौरव हा पहिल्यांदाच होत आहे. काँग्रेस कमिटीने सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घडवून आणला आहे. काँग्रेस पक्ष हा राजकारणाबरोबर सामाजिक भान ठेवणारा पक्ष असून भविष्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील.


कार्यक्रमात उत्तर सोलापूर तालुक्यातील भास्कर गायकवाड, गिरीश देवकते, विठ्ठलसिंग राजपूत, राजकुमार कांबळे, भाऊसाहेब घोडके, सुहास राऊत, शंकर वडने, श्रीमती शीला ननवरे, श्रीमती शुभांगी पवार, सतीश घंटेनवर, सुशीलकुमार पाटील, किशोर गुंड, ज्ञानेश्वर गुंड, संजय साठे, निवृत्ती दळवी या १५ आदर्श शिक्षकांचा शाल, फेटा व सन्मानचिन्ह देऊन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमाला उत्तर सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, सचिन गुंड, शंकर मोरे, शिवाजी वस्पटे सर, किसन साखरे, पप्पू साखरे, वैभव घोडके, सौ. नंदा कांबळे, कदीर पठाण, संजय येलगुंडे, संस्था अध्यक्ष मा. अरुण (नाना) घोडके (सरकार), संस्था सचिव मा. डॉ. राजीवजी दबडे, दत्तात्रेय घोडके, नंदकुमार विभुते, संतोष म्हमाने, विक्रम घोडके, विशाल घोडके, यतिराज दडे, स्वराज घोडके, दाजी गोफणे, तात्यासाहेब कादे, दीपक अंधारे, मनोज साठे, प्राचार्य श्री. रमेश अगलदिवटे, भारत बोंगे, प्रताप टेकाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा