विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माळशिरस तालुक्यातून मोठ्या संख्येने भिमसैनिक नागपूरकडे रवाना होणार*
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्याची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार 12 सप्टेंबर 2025 रोजी गणेशनगर, अकलूज येथील संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीला महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी मार्गदर्शन केले.
पक्षप्रवेश आणि नुतन पदाधिकाऱ्यांची घोषणा
बैठकीदरम्यान नवीन कार्यकर्त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या व त्यांचा सत्कार करून निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली.
नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मोठी उपस्थिती
बैठकीत सांगण्यात आले की, १ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय अ
बैठकीत ठराव घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
निवड झालेले नुतन पदाधिकारी
स्वप्निल उगाडे – तालुका प्रसिद्धीप्रमुख
बॉबी उगाडे –तालुका सहप्रसिद्धी प्रमुख
सतीश उगाडे – तालुका युवक सरचिटणीस
प्रकाश उगाडे – तालुका युवक सहसरचिटणीस
मारुती भोरे व विजय मलमे – तालुका कार्यकारिणी सदस्य
श्रीमंत नरुटे – इंदापूर तालुका संपर्कप्रमुख
या सर्व निवडींची घोषणा तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे यांनी केली, तर महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते सत्कार करून निवडीचे पत्र देण्यात आले.
बैठकीला उपस्थित पदाधिकारी
माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास उगाडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान, अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, युवक तालुकाध्यक्ष कबीर मुलाणी, तालुका युवक संघटक विकी लोंढे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई धाईंजे, अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे, सरचिटणीस मन्सूर काझी, खजिनदार इम्रान शेख, महिला आघाडी शहराध्यक्षा पुष्पाताई भडंगे, तसेच अभिषेक पवार, ऋषिकेश गायकवाड, अशोक कोळी, अर्जुन जाधव, आदेश चव्हाण, मुनाफ कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठक यशस्वी पार पडल्यानंतर सर्वांनी पक्षविस्तार आणि सामाजिक चळवळ अधिक जोमाने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा