संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
अधिनस्त कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती अहवान करण्यात येते की महाविस्तार AI ॲप प्ले स्टोअर मधून अपलोड करा व कृषि संबंधी A to Z २४ तास आठवडयाचे ७ दिवस वर्षाचे ३६५ दिवस योजना सल्ला मार्गदर्शन बाजारभाव हवामान अंदाज प्रश्न उत्तरे मराठी व इंग्रजी भाषेत यांचा लाभ घ्या ! ॲप ओपन झालेनंतर शेतकऱ्यांनी विचारलेली माहिती देऊन नोंदणी करावी व युजर आय डी व पासवर्ड तयार करून स्मरणात ठेवावा .या ॲपमध्ये माहिती मिळवण्यासाठी फार्मर आयडी किंवा मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त करून प्रविष्ट करा . ॲप मध्ये लॉगींग झालेनंतर शेतकरी बोधवांनी त्यांना माहिती पाहिजे असलेली तृणधान्य, कडधान्य ,व्यापारी पिके, भाजीपाला, फळपिके व मसाल्याची पिके निवड करावी . तदनंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ -राहुरी, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ - अकोला , डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ -दापोली , वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी ,पाणी फाऊडेशन , नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, व महाराष्ट्र शासन कृषि विभाग, महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग , मत्स्य विभाग, यांचे संयुक्त विद्यमाने सहकार्याने पिक निहाय सल्ला , गुड,GAP,SOP ॲग्रीकल्चर प्रॅक्टीस, जमिन आरोग्य पत्रिका, खत मात्रा काढणे, हवामान बदल पीक पद्धती व तंत्रज्ञान, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन , यशोगाथा, लेख, माहितीपत्रके, डिजीटल शेतताळा ,विविध मान्यता प्राप्त चलचित्रफित, नफा गणना, इत्यादी माहितीसह शेतकरी बांधवांना विचारलेल्या कृषि , मत्स्य, पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय संबंधी प्रश्नाची AI तंत्रज्ञान वापरून समर्पक तांत्रिक वैदयानिक उत्तर तत्काळ देण्याची सुविधा आहे . तसेच महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन चे बाजारपेठ निहाय बजारभाव ,आवक, जावक, विक्री इत्यादी माहिती बांधवाना त्वरीत उपलब्ध होण्याची सुविधा उपलब्ध आहे . भारत मौसम विज्ञान विभाग व महावेध वेध हवामानाचा यांचे संयुक्त विद्यमाने व सहकार्याने हवामान अंदाज ,पाऊस संभाव्यता व पुरक सल्ला शेतकरी बांधवांना तत्काळ उपलब्ध होणार यावरून प्रतिबंधात्मक एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाला मोठा हातभार लागणार आहे . महाराष्ट्र राज्य वेअर हाऊस कार्पोरेशन मार्कत उपलब्ध सुविधा माहिती मार्गदर्शन एका क्लिकवर सेंकदात उपलब्ध होणार आहे . अशा ह्या शेतकरी मित्र ,सखा कल्पवृक्ष ॲप सारख्या महाविस्तार AIॲप आपले प्रत्येकाचे ॲन्ड्राईंड फोन मध्ये समाविष्ठ करा व अमंलबजावनी करून स्वयंपूर्ण होऊन मोफत सल्ला मार्गदर्शन माहिती उपयोग आत्मसात करून निव्वळ नफा वाढणेचे अहवान सेवारत्न श्री सतीश शांताबाई कुंडलिक कचरे मंडळ कृषि अधिकारी अकलुज योनी केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा