मुख्यसंपादक -- हुसेन मुलाणी,
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ येथील खून(Murder Case ) प्रकरणातील तपासात झालेला हलगर्जीपणा चांगलाच भोवला आहे अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित(Suspend) करण्यात आले आहे. सिंदफळ येथील सत्तार यासीन इनामदार खून प्रकरणात तपासातील हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा ठपका ठेवत सय्यद पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणातील आरोपींना वेळेत दोषारोपपत्र (Chargesheet)सादर न केल्याने जामीन मिळाला होता. त्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मार्च महिन्यात तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ (Sindhphal) येथे सत्तार यासीन इनामदार यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती एक गंभीर गुन्ह्याचा तपास तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सुरेश नरवडे यांच्याकडे होता कायद्यानुसार अटकेच्या तारखेपासून 90 दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (Chargsheet)दाखल करणे बंधनकारक असते; मात्र नरवडे यांनी हे दोषारोप पत्र वेळेस सादर केले नाही अशी गंभीर त्रुटी झाली याच तांत्रिक चुकीचा फायदा घेत आरोपींनी न्यायालयात जामीन साठी अर्ज (Bail Application) केला आणि केवळ दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याच्या कारणावरून न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या(Police Department) कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यात मयत सत्तार इनामदार यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे या प्रकाराची निवेदनाद्वारे माहिती दिली होती या प्रकारामुळे इनामदार कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती अखेरीस सहाय्यक पोलीस(API) निरीक्षक नरवडे यांना तपासातील त्रुटी व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे
मयत. सत्तार यासीन इनामदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा