उपसंपादक- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
श्री संत किसन सुडके महाराज यांच्या पुण्यदिनाचे आैचित्य साधून ह.भ.प.बाळकृष्ण सुडके महाराज यांनी खास साहित्यिकांसाठी प्रथमतःच राज्यस्तरीय वाड:मयीन स्पर्धेचे आयोजन केले हाेते.त्या स्पर्धेमध्ये इंद्रजीत पाटील यांच्या ' चिबाड ' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली होती. या कवितासंग्रहातील दर्जेदार लिखाणामुळे त्यांना श्री.संत किसन सुडके महाराज जीवनगौरव पुरस्कार - २०२५ ने गाैरविण्यात आले.हा गाैरव त्यांचे प्रतिनिधी श्री.प्रकाश सकुंडे गुरूजी यांनी श्री.संत किसन सुडके महाराज ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प बालकृष्ण सुडके महाराज,मा.खासदार निलेश लंके,माजी आमदार पांडुरंगजी अभंग,ह.भ.प मुंडे महाराज,ह.भ.प भाेपळे महाराज,ह.भ.प दिघे महाराज,सतीश थाेरात,तुकाराम मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,महावस्त्र,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना यावर्षीचा मिळालेला हा चाेविसावा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.हा पुरस्कार त्यांना संतनगर-कांगाेणी, ता. नेवासा,जि.अहिल्यानगर याठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.ग्रामीण भागातील दर्जेदार लिखाण करणाऱ्या या साहित्यिकाचे सर्वत्र कौतुक हाेत आहे.श्री.पंडीतराव लाेहाेकरे,भागवत उकिरंडे,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी या पुरस्कारासाठी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा