यशवंतनगर --प्रतिनिधी
रियाजभाई तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
राज्यातील डिजीटल ई सेवा द्वारे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांमुळे त्याचा वेळ, श्रम व पैसा वाचत असुन यामध्ये महा इ सेवा व आधारसेवा धारकांनचा १०० टक्के वाटा आहे. त्यांमुळे शासनास वर्षाला ३ ते ४ हजार कोटी रुपये बचतीचे काम करीत आहे. डिजीटल माध्यमातुन लाखो युवकांना रोजगार मिळुन त्यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह होत आहे, परंतु आजपर्यंत महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारकांना शासनाकडून नेहमी सापत्न भावाची वागणुक मिळत आहे. त्यामुळे महा ई सेवा केंद्रे व आधार केंद्रे यांच्या डोक्यावरती सतत टांगती तलवार ठेवुन शासन साप मुंगसाचा खेळ खेळीत आहे. यासाठी संघटनेने हायकोर्ट मुंबई अतंर्गत खंडपीठ नागपुर येथे रिटपिटीशनही दाखल केलेले आहे. असे असतानाही शासन आपली कृती बदलण्यास तयार नाही असे दिसुन येते. त्यामुळे संघटनेच्या खालीलप्रमाणे असणान्या मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यातील सर्व महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्रे ही शासनास असहकारची भूमिका घेवुन राज्यातील सर्व महा ई सेवा केंद्रे व आधार सेवा केंद्रे दि.१२/११/२०२५ ते १४/११/२०२५ पर्यंत काम बंद आंदोलन करुन आपली केंद्रे बंद ठेवणार आहोत याची सर्व जबाबदारी शासनावर राहील. तेव्हा आमच्या असणा-या मागण्याचा योग्य तो विचार व्हावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा