*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुरग्रस्थांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देवस्थान ट्रस्टींच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.
राज्यात मागील दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी राज्यातील देवस्थानांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट, नीरा नरसिंहपूर यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देवस्थानचे मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर आरगडे, विश्वस्त प्रकाश सुरू, विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू, विश्वस्त अभयकुमार वांकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
फोटो - मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक लाखाचा धनादेश देताना श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे ट्रस्टी दिसत आहेत.
---------------------------


 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा