Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

तुळजापूर सामाजिक वनीकरण कार्यालयाचा अजब कारभार २२हजार झाडांचे वृक्षारोपण केल्याचे कागदोपत्री दाखवून प्रशासनाची दिशाभूल करून भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण उघडकीस


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

मागील पाच वर्षात तुळजापूर सामाजिक वनीकरण विभागाने एकही झाड लावले नाही,” अशी धक्कादायक माहिती अधिकारात (RTI) देणाऱ्या तुळजापूर सामाजिक वनीकरण विभागाचा अजब कारभार समोर आला असुन एकीकडे वृक्षारोपण 'निरंक' असल्याचे अधिकृतपणे कळवले जात असताना, दुसरीकडे शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत सिंदफळ येथील (ता. तुळजापूर) शिवारात २२ हजार झाडे लावल्याचा फलक लावून अनागोंदी प्रकार उघडकीस आला आहे. अशी माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर शामराव जमदाडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, हा वृक्षारोपणाचा फार्स केवळ कागदोपत्री काम दाखवून आणि फोटो सेशन करुन मलाई लाटली असून खोटा फलक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आज (दि. २२ ऑक्टोबर) रोजी सिंदफळ येथील गट नंबर १७४ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा एक फलक आढळून आला आहे. या फलकावरील माहिती धक्कादायक आहे.

फलकावरील माहिती काय सांगते?तुळजापूरः "पाच वर्षात एकही झाड लावले नाही,” अशी धक्कादायक माहिती अधिकारात (RTI) देणाऱ्या तुळजापूर सामाजिक वनीकरण विभागाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. एकीकडे वृक्षारोपण 'निरंक' असल्याचे अधिकृतपणे कळवले जात असताना, दुसरीकडे शासनाची दिशाभूल करण्यासाठी सिंदफळ (ता. तुळजापूर) शिवारात तब्बल २२ हजार झाडे लावल्याचा फलक लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर जमदाडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, हा केवळ कागदोपत्री काम दाखवण्यासाठी आणि फोटो सेशन करण्यासाठी लावलेला खोटा फलक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.




आज (दि. २२ ऑक्टोबर) रोजी सिंदफळ येथील गट नंबर १७४ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा एक फलक आढळून आला आहे. या फलकावरील माहिती धक्कादायक आहे.


फलकावरील माहिती काय सांगते?

महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग, उस्मानाबाद 

ठिकाण गाव सिंदफळ गट क्रमांक१७४ परीक्षेत्र तुळजापूर 

 क्षेत्र १० हेक्टर+४ हेक्टर 

 रोपाची संख्या १६०००+६४००

  लागवडीचे वर्ष सन -२०२२

    *आर टी आय ( RTI) मधील माहिती काय आहे?*

  या उलट तुळजापूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर शामराव जमदाडे यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभागाकडे मागील पाच वर्षातील (२०२०ते२०२५)और वृक्षारोपणाची माहिती मागवली होती त्यांच्या त्या मागणीला वनीकरण विभागाने ७ ऑक्टोबर २०२५ या तारखेला अधिकृत लेखी उत्तर दिले त्यामध्ये मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सामाजिक वनीकरण कार्यालयात कडून तुळजापूर तालुक्यात कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपणाची कार्य केले नाही असे स्पष्ट म्हणले आहे त्या अनुषंगाने लागवड खर्च आणि जिवंत झाडांची माहिती निरंक असल्याचे विभागाकडून लेखी स्वरुपात मान्य केले होते निरंक माहितीच्या विरुद्ध आता २२हजार झाडे या नवीन फलकामुळे मोठा गोंधळ आणि विभागाच्या कार्य शैलीवर संशय निर्माण झाला आहे 


१) जर सन २०२२ (हे मागील पाच वर्षातील आहे) सिंदफळ येथे गट क्रमांक१७४ मध्ये २२ हजार रोपांची लागवड झाली होती तर माहिती अधिकारामध्ये काम निरंक आहे अशी खोटी माहिती का दिली..?

२) आणि जर या माहिती अधिकारातील उत्तर सत्य असेल (म्हणजे एक ही वृक्षारोपण केले नाही)तर मग २२ हजार झाडांचा शासकीय फलक कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या दृष्टिकोनातून लावला? 

३) केवळ फलक लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि शासनाची दिशाभूल करण्याचा हा डाव असेल का? या प्रकारामुळे प्रत्यक्षामध्ये कोणतेही काम न करता फक्त फलक लावून शासकीय निधी हडपण्याचा अथवा खोटे रेकॉर्ड बनवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे का? असा संतप्त सवाल विचारला जात असून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे 

     तुळजापूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात अधिकारी व कर्मचारी केव्हाच उपस्थित नसतात चौकशीसाठी गेल्यानंतर केवळ शिपायाची भेट होते आणि ठरलेल्या उत्तरापैकी एक उत्तर मिळते ते म्हणजे साहेब फिल्डवर गेले आहेत असे नागरिकांचे म्हणणे असून याबाबत माहिती अधिकारा मधूनच हे स्पष्ट झाले आहे की मागील ५ वर्षात वृक्षारोपणाचा कोणताही कार्य झाले नाही मात्र २२ हजार झाडांचे वृक्ष आपण केल्याचे दिशाभूल करणारे खोटे फलक लावले जात असतील तर सामाजिक वनीकरणाचे तमाम अधिकारी आणि कर्मचारी कोणत्या फिल्डवर असतात? हा संशोधनाचा प्रश्न असून याबाबत नागरिकांत प्रतिक्रिया येत आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता ही हा सवाल करत आहे या विभागाचे कोणतेही काम नसताना या विभागात शासन पोसुन काय साध्य करत आहे शिवाय जनतेच्या पैशाचा गैरवापर का करत आहे याचा जबाब प्रशासनाने द्यावा अशी मागणी जोर धरत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा