Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

विवाहाचा खर्च आम्ही उचलतो संसार सेट आम्ही देतो एक लाख रुपये रोख आम्ही देतो त्यातील तुम्ही फक्त पाच हजार रुपये आधी भरा --असे सांगून फसवणूक करणाऱ्या टोळीपासुन सावधान ....!


 

इक्बाल बाबासाहेब मुल्ला सांगली

( पत्रकार), मो:-8983 587 160

विवाहाचा खर्च. आम्ही उचलतो, संसारसेट आम्ही देतो,1 लाख रुपये

"रोख " आम्ही देतो, तुम्ही फक्त त्यातील 5000 रुपये आधी भरा,आम्ही सामाजिक संघटना चालवतो,आमची ट्रस्ट आहे, असे "मोबाईल" वर "खोटे" बोलून 1 लाख न देता फसवणूक करणाऱ्या, जनतेला लुटणाऱ्या टोळीचा आज "पर्दाफाश" होत आहे.

हॉस्पिटल खर्च, बिल व अन्य खर्चाची चिंता नको आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत 5-10 हजार रुपयांची "मागणी" करणाऱ्या काही "फ्रॉड" लोकांचे मॅसेजेस "सोशल मीडियावर" सऱ्हास येत असून जनतेने या फसवणुकीपासून सावध राहण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

मुलीच्या वडिलांना. विवाहासाठी आधीच पैशाची "अडचण" असताना कोणीतरी फोन करतो, किंवा सोशल मीडियावर Msg करत हें दलाल मुलीच्या असहायतेचा गैरफायदा उचलतात.

फक्त 5000 रुपये. देऊन 95000 मिळतात म्हणून पालक यांच्या "जाळ्यात" फसतात आणि हें फ्रॉड करणारे मालामाल होतात.

या भामट्यांना फोन केल्यावर फोन लागतो,त्यानंतर पैशाची "देवाणघेवाण" झाल्यावर फोन नंबर "बंद" केला जातो.एखादा शहाणा/चाणाक्ष. माणूस समोर असल्यास हें भामटे बोलणे आवरते घेत फोन "कट" करतात.

गरजवंतांना अक्कल नसते तथापि या निरागस पालकांना फसवून त्यांचा पैसा बळकावण्यात काय ते धाडस ??? अशा नीच प्रवृत्तीच्या भामट्यांचा पर्दाफाश करणे काळाची गरज होती.म्हणूनच सदर लेखप्रपंच ! 

दवाखाना बिल भरतो /विवाहाचा खर्च उचलतो 5000 भरा या अमिषाला कोणीही बळी पडू नये.

व्हाट्सअप/ फेसबुक /इंस्टाग्राम मधील जाहिरात फ्रॉड आहे. पैसे दिल्यास "पश्चाताप" करण्याशिवाय "गत्यंतर" राहणार नाही.


आ. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा