Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

ओंकार साखर कारखाना शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार!* *--मोफत साखर वाटपाचा शुभारंभ


 

निमगाव ( म)-- प्रतिनिधी  रामचंद्र मगर

टाइम्स 45 न्यूज मराठी 

ओंकार साखर कारखाना चांदापुरी यांच्यावतीने ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारीवर्ग यांना दिपावली सणासाठी ऊसाच्या टनेज प्रमाणात मोफत साखर वाटपाचा शुभारंभ चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनलमॅनेजर भिमराव वाघमोङे होते या वेळी बोलताना रामभाऊ मगर म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारीवर्ग यांची दिपावली गोङ व्हावी या उदात्त हेतूने दर वर्षी सणाला मोफत साखर देऊन सर्वासमोर एक आदर्श निर्माण केला तसेच दिपावली साठी ऊसाचा दुसरा हाप्ता 20५ रूपये प्रमाणे बॅकेत जमा झाला बोञे पाटील यांच्या मोफत साखरेच्या उपक्रमाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करून अभिनंदन केले 

या वेळी माजी उपसरपंच तात्या चोरमले चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते केन मॅनेजर शरद देवकर समाधन गायकवाङ ऊस उत्पादक शेतकरी महादेव मगर किसनराव मगर सर्जेराव पिंगळे नितीन जाधव बाळासाहेब मोटे मोहन मगर धर्मा बोङरे यासह बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते आभार रमेश औताङे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा