संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
श्रीपुर ता. माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२६ चा मोळी पूजनाचा शुभारंभ कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी प्रारंभी मोळीचे पूजन कारखान्याचे तज्ज्ञ संचालक दाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन कैलासराव खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व सर्व संचालक उपस्थित होते.
या गळीत हंगाम २०२५/२६ च्या मोळी पुजना प्रसंगी बोलताना
कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, यावर्षी कारखाना ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करणार असून. सध्या
सर्वच कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने कारखाना तोडणी यंत्राचाही ऊस तोडणीसाठी वापर करणार आहे. त्याप्रमाणे कारखान्याने स्वतः च्या मालकीची तोडणी वाहतूक यंत्र विकत घेतली. याशिवाय इतर तोडणी यंत्र धारकाबरोबरही करार केलेले आहेत,
ही सर्व तोडणी यंत्रे या हंगामात कारखान्यास उसाचा पुरवठा करणार आहेत.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण, उमेशराव परिचारक ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे भास्कर कसंगावडे भैरू वाघमारे
. गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील यांच्यासह कार्यक्षेत्रातील पदाधिकारी आणि कारखान्याचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
*कारखान्याने केली ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी*
ऊस तोडणी यंत्राबाबत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना चे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले,कि कारखाना यावर्षी प्रतिदिन सुमारे ९५०० मे. टन गाळप क्षमतेने चालणार असून प्रतिदिन ९०,००० लि. क्षमतेचा आसवणी प्रकल्प आणि २९ मे. वेंट को-जनरेशन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालवले जाणार आहेत, यासाठी आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी कारखान्याने केली असून त्याप्रमाणे कार्यक्षेत्रात ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी मंजूर व वाहने येण्यास सुरुवात झाली असल्याचे म्हटले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा