सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
विद्या प्रतिष्ठान संचलित इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, पुणे यांच्या वतीने प्रभावी शैक्षणिक कार्याबद्दल “गुरूसन्मान २०२५” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी ( पुणे ) येथे संपन्न झाला. पश्चिम महाराष्ट्र शिक्षक सेना अध्यक्ष सुनिल जगताप, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे,माजी राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि ॲड. सुधाकर कापरे या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले.
ज्ञानप्रसारातील उल्लेखनीय योगदान, शैक्षणिक नेतृत्व व तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धतींच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल डॉ. सुजय देशपांडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प, भगवी पट्टी व भगवा फेटा असे होते.
डॉ. सुजय देशपांडे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नवे आयाम निर्माण केले आहेत. त्यांनी संस्थेत तंत्रज्ञानाधारित अध्यापन, शिस्तबद्ध कार्यसंस्कृती, संशोधनवृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता व नवनवीन अध्यापन पद्धतींसाठी राज्यातील एक आदर्श संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये ज्ञाना बरोबरच नैतिक मूल्ये, सामाजिक भान आणि स्पर्धात्मकता विकसित झाली आहे. त्यांच्या या शैक्षणिक दृष्टिकोनामुळे संस्था शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी ठरली आहे. या कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे यांचे तर्फे ‘गुरुसन्मान २०२५’ हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यानिमित्त सत्कारमूर्ती डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण विद्या प्रतिष्ठान परिवाराचा आहे. शिक्षक, सहकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्या मुळेच हे यश शक्य झाले. ‘गुरूसन्मान’ हा मला पुढील वाटचाली साठी अधिक प्रेरणा देणारा सन्मान आहे. शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम नसून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य आहे. आगामी काळात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा खासदार सौ. सुनेत्रा अजित पवार, उपाध्यक्ष अशोक वासुदेव प्रभुणे, सचिव मा. ॲड. नीलिमा विनोदकुमार गुजर आणि रजिस्ट्रार कर्नल श्रीश कंबोज यांनी डॉ. सुजय देशपांडे यांचे अभिनंदन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा