Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

भाविकांना सफरचंद वाटप हा एक चांगला धार्मिक उपक्रम--- वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,संजय जगताप* *श्री गणेश हायवे च्या वतीने कोजागिरी निमित्त तुळजापुरला जाणाऱ्या भाविकांना सफरचंद वाटप

 


सोलापूर --प्रतिनिधी

आबिद बागवान

टाइम्स 45 न्यूज मराठी

श्री गणेश हायवे [एसआर पेट्रोल पंप] तुळजापुर रोड येथे सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमे निमित्त तुळजापुरला पाई चालत जाणार्‍या देवी भक्ताना श्री संजय जगताप वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर तसेच श्री मशरूम गणपति मंदिर पुजारी श्री धनंजय पतंगे यांच्या शुभ हस्ते सफरचंद [फळांचे] भाविकाना वाटप करण्यात आले या प्रसंगी श्री नीलकंठ जाधवर, हरिदास पांढरे, बाबासाहेब मुंडे, राजेंद्र गवेकर, निलेश स्वामी आदि उपस्थित होते. या वळी बोलताना श्री संजय जगताप यानी सफरचंद [फळांचे] वाटप देवी भक्तासाठी केला हा एक चांगला धार्मिक उपक्रम राजू हौशेट्टी यानी केला त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो व आशीच सामाजिक धार्मिक कार्य त्यांच्या हातून होत राहो,आणी आपला सर्वांणवर आई तुळजा भवानी मातेची कृपादृष्टी राहो आशी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. या प्रसंगी श्री संजय जगताप साहेब यांचा व मान्यवरांचा श्री मशरूम गणपति ची प्रतिमा शाल बुके देवून पुजारी धनंजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. यावेळी राजू हौशट्टी यानी सर्व देवी भक्ताना सुख शांति समृद्धि लाभो आणी आशीच सेवा करण्याचा आशीर्वाद राहो आशी आई तुळजा भवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.सवीता सुनील देशमुख, कुमारी स्नेहा राजकुमार हौशेट्टी, कुमारी समृद्धि रामशेट्टी, कुमारी ऋतुजा रामशेट्टी, दीपक देशमुख, कुमार सुरवसे, हीरा बावरी, राम कंतारी, सोमा सरवसे, दत्ता जाधव, आदर्श बमगोंडे, गणेश हौशेट्टी ,नागराज हौशेट्टी व राजू हौशेट्टी मित्र परिवार .............फोटो ओळ..... ...कोजागिरी पौर्णिमे निमित्त तुळजापुरला पाई जाणार्‍या देवी भक्ताना सफरचंद फळांचे वाटप प्रसंगी.संजय जगताप, धनंजय पतंगे, नीलकंठ जाधवर,गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी, राजू हौशेट्टी व मित्र परिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा