सहसंपादक -डॉ. संदेश शहा, इंदापूर,
मो. ९९२२४१९१५९
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती सोबत राहून
लढवण्याचा ठराव इंदापूर येथे झालेल्या रिपाइंच्या बैठकीत शनिवार दि.२५ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या अध्यक्षते खाली ही बैठक संपन्न झाली.
रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आदेश तसेच महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे व महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या सुचने नुसार ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीत रिपाइंच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या ३ नोव्हेंबर रोजी महाड येथे होणाऱ्या कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी ग्वाही रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी दिली तर नितीन झेंडे यांनी आभार मानले.
रिपाइंचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी आगामी सर्व निवडणुकीत विजयाचे मतदान आमच्याकडेच असल्याचे सूतोवाच केले.
या बैठकीस दौंडचे नेते नरेश डाळींबे, इंदापूरचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, इंदापूरचे शहराध्यक्ष अमोल मिसाळ,
तालुका मुख्य सरचिटणीस राकेश कांबळे, सरचिटणीस महेश भोसले, कार्याध्यक्ष नितीन झेंडे, खजिनदार भारत सावंत, उपाध्यक्ष समाधान भोसले, विकास साबळे हे मान्यवर बैठकीस उपस्थित होते.
फोटो ओळ : बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेले रिपाइंचे प्रमुख नेते व कार्यकर्ते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा