संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
लातूर शहरात एंजल वन, उन्नती आणि राह फाउंडेशन यांच्या सहकार्याने आणि संजीवन एकात्मिक विकास व संशोधन संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या समर्थ प्रकल्पा अंतर्गत संगणक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, स्पोकन इंग्लिश, जीवन कौशल्य, संवाद कौशल्य, समस्या सोडविणे, स्वयं व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरता अशा विविध कोर्सेस पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राह फाउंडेशनचे उपाध्यक्ष गणेश नेवळकर,वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक मोहन राठोड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खुशीग्राम संस्थेच्या वर्षा साळवे होत्या. साळवे म्हणाल्या,आपण सगळे एक परिवार आहोत आणि प्रत्येकाची समाजाप्रती एक नैतिक जबाबदारी आहे.समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करणे काळाची गरज आहे.
तसेच शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही मदत लागल्यास आम्ही सदैव मुलांच्या सोबत असल्याचे त्या म्हणाल्या.प्रमुख पाहुणे गणेश नेवळकर यांनीही प्रामाणिकपणे कष्ट घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थिंनी पस्तीस दिवसात शिकलेल्या अनुभवावर प्रकाश टाकला.चेंज मेकर आशा तिवारी शेवटी म्हणाल्या,आजच्या काळातील मुलांनी शिक्षणाबरोबर अर्थार्जनासाठी विविध कौशल्य आत्मसात करावीत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गोरे यांनी केले तर उपस्थित प्रमुख पाहुणे,प्रशिक्षणार्थी यांचे आभार ऋषिकेश भोसले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा