Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

निरा भिमाचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदिपन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते संपन्न


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

                                -----शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी सन 2025-26 च्या 25 व्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. 

     याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक महेशकुमार शिर्के व धनश्री शिर्के या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. कारखान्याचे आगामी गळीत हंगामामध्ये 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सुसज्ज झाली असल्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले. यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ, तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ___________________________

फोटो:-शहाजीनगर येथील निरा भिमा कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा