Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

"लव्ह जिहाद" नाही मग हा"भगवा ट्रॅप"चा विषारी विळखा तर नव्हे ना?पालक -समाज-धार्मिक विद्वान कधी 'डोळस' होणार?..


 

इकबाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार )सांगली, 

मो:-8983 587 160

गेल्या 1 -2 वर्षात सांगली जिल्ह्यातील *मुस्लिम* समाजातील "कित्येक मुली" या *अन्यधर्मीय* तरुणांसमवेत *पळून* गेल्या. मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया "शून्य" !

 कित्येक वर्षात मुस्लिम समाजातील मुलींचे अन्य मुलांसमवेत *प्रेमप्रकरणे* ,त्यानंतर त्यांच्या घरात जाऊन "आई - वडिलांना" केलेले *प्रबोधन*, परिणाम "शून्य" ! 

मुस्लिम धर्मातील सर्व *चालीरीती* - "धार्मिक प्रवचन" घरात *इस्लामी पेहराव*, तरीही परिणाम "शून्य" !

काही दिवसापूर्वी एका मुस्लिम मुलीचा *साखरपुडा* झाला.दुसऱ्या दिवशी ती मुलगी *अन्यधर्मीय* प्रियकराबरोबर *फरार*.आणि लगेच त्यांच्यासमवेत *हिंदुपद्धतीने लग्न* ! तरीही मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया "शून्य" !

एका वर्षात चुकून मुस्लिम तरुणाने एखाद्या *अन्यधर्मीय* तरुणीसोबत केलेला विवाह *लव्हजिहाद* मानला जातो,मुस्लिमांच्या नावाने "शंख" केला जातो, परंतु एका वर्षात *8 - 10 मुस्लिम तरुणींना* टारगेट करत केलेले विवाह - झालेले *धर्मपरिवर्तन* , लव्ह जेहाद - लव्हजेहाद अशी "गरळ" ओकत *मुस्लिमांची* विनाकारण होत असणारी *बदनामी* याला कोणते *सर्टिफिकेट* द्यावे ?? याला कोणते *नावं* द्यावे ??

 *मुस्लिम समाज "षंड" आहे का ??*

*प्रेषित मोहम्मद पैगंबर* यांना मानणारा मुस्लिम समाज ,*हजरत टिपू सुलतान* यांच्या देशप्रेमाने - धाडसाने "प्रेरित" झालेला हा मुस्लिम समाज आहे. उठसुठ कोणीही उठून तुमच्या *आई - बहिणीसोबत* "दुष्कृत्य" करत असेल तर तुम्ही कितीवेळ "शांत" बसणार आहात ?? मुस्लिम "षंड" नाहीत तर *झुंजार* आहेत, ते भलेही *शांतताप्रिय* आहेत परंतु त्यांच्या *विचारांना* - कृतीला आज *गंज* लागला आहे. *सहनशक्तीचा* "फुगा" पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे अन्य पुरुषाचे *धाडस* वाढले आहे. 

मुस्लिमांनी आपला *स्वाभिमान गहाळ* ठेवला आहे का ?? मुस्लिम समाजात काय चालले आहे ??? या "प्रवृत्तीला" रोखणार कोण ?? *धार्मिक विद्वान* आणि समाजाला "दिशा" देण्यासाठी ज्यांना *नियुक्त* केले आहे ते *धर्मप्रसारक* शांत का आहेत ?? ते *कानाडोळा* का करत आहेत ?? त्यांची समाजाप्रती काही *जबाबदारी* नाही का ??? "काळ" सोकावत चालला आहे हें भयंकर प्रकार कधी थांबणार ??? याला "पालकच" सर्वस्वी जबाबदार आहेत का ? *जातीय* विषवल्ली असणाऱ्या काही प्रवृत्तीचे याला *बळ* असेल का ..?? मुस्लिम मुलींना *टारगेट* करण्यासाठी या तरुणांना कोणी *प्रलोभन* देत असेल का ?? मुस्लिम धर्मातील मुलींना अन्य धर्मात आण्यासाठी *आर्थिक सहाय्य* करत असतील का ?? हें "षडयंत्र" असेल तर याचा *मास्टरमाइंड* कोण ?

हा प्रकार लव्ह जेहाद नव्हे तर *भगवा ट्रॅप* चा पडलेला सांगलीला *विषारी विळखा* आहे का ?? जो सांगलीला *डंख* मारतोय,

मुलींचे पालक कधी "जागे" होणार ???

भगवा ट्रॅप आणि लव्ह जेहाद हें शब्द सर्व *बकवास* आहेत,कारण *संस्कारक्षम* मुलगी कधीच "चुकीचे पाऊल" उचलत नाही.मग या ट्रॅप ला कारणीभूत कोण ??? याला भगवा ट्रॅप आणि लव्ह जेहाद हें शब्दच *गैरलागू* आहेत. समाजाच्या डोळ्यात *अंजन* घालण्यासाठी हें "शब्द वापरावे" लागले.असो

 *पालकांची भूमिका "गुलदस्त्यात" !*

तुमची मुलगी "क्लासला" जाताना, शाळेत जाताना किंवा *कॉलेजला* जाताना कोणासमवेत जाते,त्या *मैत्रिणीचे कॅरेक्टर* कसे आहे ?? हें तुम्ही "तपासले" आहे का ??शाळेची- कॉलेजची *वेळ* किती असते हें पालकांना माहित आहे का ?? *EXTRA तास* आहे म्हणून किंवा कॉलेज ला "सुट्टी" आहे म्हणून तुमची मुलगी त्याच्या *बॉयफ्रेंडसोबत* फिरायला - *लॉजमध्ये* जाते का ?? याची माहिती तुम्ही घेतली आहे का ??? कारण कित्येक वेळा रस्त्यावर जाताना हें *हॉटेल - लॉज* समोर असे प्रकार "निदर्शनास" येताना दिसतात. मुस्लिम समाजातील समाजसुधारक - *राजकीय* क्षेत्रातील अग्रगण्य आणि मुस्लिम धर्मातील *धर्मगुरू* यांनी याबाबत तात्काळ पुढाकार घेत या "विषवल्लीपासून" समाजातील "*तरुणींना* वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा "काळ" कधीही *माफ* करणात नाही !


. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - सांगली मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा