Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

*तामलवाडी ता. तुळजापूर येथे औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांचे कर वसुली करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे शिवाजी सावंत यांचा आक्रोश आंदोलनाचा इशारा* *विस्तार अधिकाऱ्यांना देणार साडी चोळी बांगड्या?*

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व इतर सर्व नावाजलेल्या कंपन्यांना कर वसुलीची नोटीस बजावली असूनही मागील अडीच वर्षांपासून वसुली करण्यासाठी चालढकल करणाऱ्या विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना साडी, चोळी व बांगड्या भेट देऊन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

     कंपन्या द्वारे होत असलेल्या ग्रामपंचायत करचूकवेगिरी मागील अडीच वर्षापासून वारंवार आवाज उठवत असून प्रशासनाची कर वसुली करण्याची जबाबदारी असतानाही प्रशासकीय अधिकारी कंपन्याकडून कर वसूल करण्यास कानाडोळा का करत आहेत हा संशोधनाचा प्रश्न आहे कर वसुली बाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे अखेर शिवाजी सावंत यांनी असा निर्णय घेतला आहे की

११ नोव्हेंबर पर्यंत प्रशासनाने ग्रामपंचायत अधिनियम १९५८ प्रमाणे वसुली कारवाई करण्यात आली नाही, तर आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक सावंत शिवाजी यांनी विस्तार अधिकारी (पंचायत) व तामलवाडीचे ग्रामसेवक यांना साडी, चोळी व बांगड्या देऊन आक्रोश व्यक्त करण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गटविकास अधिकारी यांना देण्यात आला आहे.

                       *जाहिरात*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा