Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

अकलूज येथील बालरोग तज्ञ डॉक्टर राजीव राणे (कविटकर) यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 *मुख्यसंपादक--टाइम्स 45 न्यूज मराठी- मो:-9730867448*




संपूर्ण सोलापूर  जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर व सुप्रसिध्द अकलूज येथील                         " ॲपेक्स हाॕस्पिटल "     चे प्रेसिंडेट, सर्वांचे लोकप्रिय असलेले  नामवंत  बालरोगतज्ञ डॉ. राजीवजी कृष्णा राणे  (कविटकर) यांना 73 व्या वाढदिवस  विविध सामाजिक  उपक्रमाने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.                  ॲपेक्स हाॕस्पिटल च्या काॕन्फरन्स हाॕल मध्ये प्रसिध्द हृदयरोगतज्ञ नितीनराजे राणे यांच्या मार्गदर्शनाखाली  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन शिशुपालरोगतज्ञ डॉ.मनिष राणे यांचे  हस्ते करण्यात आले. शंकरराव मोहिते-पाटील   ब्लॕड बॕकेतर्फे नियोजन करण्यात आले होते.     



  प्रारंभी सत्कारमुर्ती डॉ.राजीव राणे सर यांना डॉ.सौ.शितलदेवी राणे, स्त्रीरोगतज्ञडॉ.रेवती राणे व रेडीओलाॕजिष्ट डॉ.स्नेहल राणे यांनी औक्षण केले.आरोग्यसंपत्ती च्या देवता धन्वतंरी  यांचे पूजन करुन रक्तदान शिबीराचा शुभारंभ करणेत आला. तसेच वाढदिवसानिमित्त ७३ गोरगरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तसेच रुग्णांना फळे वाटप डॉ.सूरज एकतपुरे व डॉ. अमित शेटे यांचे हस्ते करणेत आले.अकलूज शहरातील बज्मेअन्वारे सोफिया या मदरशा मध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या शंभर   विद्यार्थ्यांना ॲपेक्स हाॕस्पिटल चे मॕनेजर राजू शिंदे व डॉ. अजय कविटकर यांच्याहस्ते  खावू वाटप करण्यात आले.             



                       या मदरशातील धर्मगुरू हाफीज रफीकुल कादरी यांनी  फातेहखानी करुन  डॉ.राणे  परीवारांसाठी दुवा करणेत आली.यावेळी पत्रकार हुसेन मुलाणी, संजय लोहकरे, केदार लोहकरे उपस्थित होते,  डॉ.राजीव राणे सर यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या वैद्यकीय कार्यकिर्दी मध्ये हजारो रुग्णांना जीवदान दिले.सोलापूर, सातारा, पुणे,व सांगली जिल्ह्यात त्यांची ख्याती असुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय , सामाजिक , वैद्यकीय , धार्मिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर तसेच त्यांचे हजारो चाहते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते            .








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा