संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
पोशीर धरण आणि चिल्हार धरण प्रकल्पांना परवानगी प्रक्रिया न पूर्ण करता दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करावी अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि
पोशीर धरण आणि चिल्हार धरण या प्रकल्पांना शासन स्तरावर मंजुरी देण्यात आलेली आहे तथापि सदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन व नुकसान भरपाई प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तरी सर्व कायदेशीर आणि पर्यावरणीय प्रक्रिया पूर्ण न होता प्रकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे हे वनसंवर्धन अधिनियम 1980 आणि जमीन संपादन अधिनियम 2013 च्या नियमांचे उल्लंघन ठरते तसेच या प्रकल्पामुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही मागणी करीत आहोत या धरणात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार असल्याने अनेक परिवार बाधित होणार आहेत तरी त्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंपादित होऊन त्यांना मोबदला मिळेपर्यंत आणि वन विभागाची परवानगी मिळेपर्यंत सदर दिलेली मंजुरी प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात यावी. या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवत ठराविक ठेकेदारांना (कॉन्ट्रॅक्टर) ना काम मिळवून देण्यासाठी काही राजकीय पदाधिकारी शासकीय अधिकारी यांनी मिलीभगत केली आहे तरी शेतकरी हितासाठी आम्हाला ही प्रशासकीय मान्यता (मंजुरी) रद्द झाली नाही तर आंदोलन करावे लागेल कारण उदाहरणार्थ कोंढाण्या सारख्या प्रकल्पावर शासनाचा कोट्यावधी रुपये वायपट खर्च झाला आणि परत तेच काम सिडकोकडे हस्तांतरित करण्यात आले अशी अनेक कामे कोकणामध्ये बंद पडून आहेत जनतेचा पैसा वायफट पडून राहत आहे तरी सदर प्रकल्पासाठी वन विभागाची मंजुरी प्रक्रिया आणि शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही निविदा काढू नये अन्यथा नाइलाजस्तवं आंदोलनाने न्याय मिळाला नाही तर शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनतेच्या टॅक्स मधून लुटला जाणारा पैसा वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, जलसंपदा विभाग सचिव, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कोकण प्रदेश अधीक्षक अभियंता उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ कळवा, कार्यकारी अभियंता रायगड पाटबंधारे बांधकाम विभाग क्रमांक दोन सीबीडी बेलापूर यांना निवेदनाद्वारे कळवले आहे
कळावे आपला विश्वासू
अतुल खूपसे पाटील





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा