Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवेचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते लोकार्पण* *कामचुकार अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा दिला इशारा


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

 मो:-- 9922419159

इंदापूर तालुका व पंचक्रोशीतील सर्वसामान्य किडनी रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून यासंदर्भात रुग्णांना लागणाऱ्या सर्व तपासण्या, औषधे देखील मोफत पुरवले जाणार आहे. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांनी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील या सेवेचा लाभ घेऊन आपले आरोग्य चांगले ठेवावे असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटरचे लोकार्पण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालया तील रुग्णांशी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली, सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे व डॉ. श्रेणिक शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अहमदरजा सय्यद, माजी उपनराध्यक्ष दिलीप वाघमारे, राजेंद्र शिंदे, प्रा. अशोक मखरे, महादेव लोखंडे, वसीम बागवान, अविनाश मखरे, सुधीर मखरे, प्रशांत सिताप, सर्व वैद्यकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, रुग्णांना मोफत सेवा देताना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच विविध चाचण्या करणाऱ्या अधिकारी यांनी कामात हलगर्जी पणा करू नये. कोणताही रुग्ण उपचार घेण्यासाठी आनंदाने येत नसतो, त्याला अडचण असते, हे समजून घेतले पाहिजे. या सूचनांचे पालन केले नाही तर कामचुकारवर निश्चित कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.  



उपजिल्हा रुग्णालया तील रुग्णांशी मंत्री दत्तात्रय भरणे संवाद साधत असताना अनेक रुग्णांनी अंघोळीसाठी गरम पाणी तसेच पिण्या साठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार केली. त्याची तात्काळ दखल घेत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत जाधव यांना फोनवर सूचना देत, माझ्या स्वखर्चाने रुग्णालयास दोन हजार लिटरचे सोलर वॉटर हीटर व पाचशे लिटर क्षमतेचे शुद्ध पिण्याच्या पाण्याची फिल्टर आठ दिवसाच्या आत बसवून देण्यास सांगितले असता उपस्थित सर्वांनी त्याचे उस्फूर्तपणे स्वागत केले. 

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक व इंदापूर तालुक्याच्या आसपासच्या गावातून गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी रुग्णांना रेबीज व स्नेक बाईटच्या लसी, खोकला व अन्य आजारावरील औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची अडचण होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी निदर्शनास आणून दिले असता यावर तात्काळ योग्य कार्यवाही करण्याच्या आदेशवजा सूचना मंत्री भरणे यांनी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा