Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

इंदापूर तालुक्यातील बेडशिंगें येथील भूमीपुत्र कपिल प्रवीरा सुभाष मिसाळ याने पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी करून घडविला इतिहास, ही कामगिरी करणारा तो राज्यातील एकमेव, त्याची आगामी दुबई व ग्रीक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शिफारस.

 *सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-- 9922419159*

कधी कधी संघर्षच मनुष्याला घडवतो, आणि हाच संघर्ष जेव्हा  जिद्दीच्या रूपात प्रकटतो, तेव्हा त्यातून निर्माण होतात ती प्रभावी व्यक्तिमत्त्व. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इंदापूर तालुक्यातील बेडशिंगें या गावातील भूमीपुत्र कपिल प्रवीरा सुभाष मिसाळ हे एक सामान्य परिस्थितीतून घडलेले असामान्य व्यक्तिमत्व होय. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिंपिक समिती मान्यता प्राप्त पॅरा ऑलिंपिक कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने दिल्ली येथे नुकतेच संपन्न झालेल्या स्पर्धेत त्यांनी वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून लक्षवेधी कामगिरी केली. त्याची दखल घेऊन समितीच्या वतीने आगामी दुबई तसेच ग्रीक मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिंपिक समिती 

स्पर्धेसाठी त्यांच्याच नावाची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून सर्वोच्च कामगिरी करून त्याने इतिहास घडवून इंदापूरचे नाव संपूर्ण देशात गाजवले आहे. देशाचे राष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक कार्यकर्ते महादेव मिसाळ, हनुमंत घोडके यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे




कपिल प्रवीरा सुभाष मिसाळ याचा जन्म

७ मे १९९२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील छोट्या बावडा या गावी झाला. माणुसकीच्या मातीने नटलेल्या आजोळी कडक शिस्तीला प्राधान्य होते. त्यांच्या आईचे वडील हे नावाजलेले तालुका मास्तर स्वर्गीय भिमराव दामोदर कांबळे हे होते. त्याचा प्रवास हा मेहनत, संस्कार, आत्मविश्वास आणि चिकाटीचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्याचे वडील सुभाष अर्जुन मिसाळ यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन पोलीसदलात अधिकारी म्हणून चांगला नावलौकिक मिळवला. त्यांनी महाराष्ट्र तसेच अनेक राज्यांमध्ये अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये कर्तव्य बजावले. काही वेळा तर ते अक्षरशः मृत्यूच्या दाढेतूनही परत आले. त्यांच्या कार्य तत्परते मुळे त्यांना अनेक पोलिस पदके आणि सन्मान मिळाले. समाज आणि राष्ट्रासाठी वडिलांची सेवा हीच कपिल यांच्यासाठी प्रेरणा  ठरली. त्यांची आई ( माई ) सौ. प्रवीरा सुभाष मिसाळ यांनी सर्व आयुष्य कुटुंबासाठी वाहून घेतलं. आपल्या मुलांनी काहीतरी मोठे करून आपल्या देशाचे व परिवाराचे नाव कमवावे हीच तिची ध्येयवेडी भावना होती. आईच्या त्यागाने त्यांच्या मनात यश, माणुसकी, संवेदनशीलता आणि समतेची भूक रुजली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील प्रेरणा प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे झाले. त्यानंतर त्यांनी श्री. जैन फत्तेचंद कॉलेजमधून विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली. इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी कबड्डी व व्हॉलीबॉल या खेळात त्यांनी जिल्हा स्तरावर संघ कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली. बारावी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कबड्डी खेळात जिल्हा, राज्य आणि विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधित्व करून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गुणवंत खेळाडू म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. फर्ग्युसन महाविद्यालय इथून त्यांनी सामाजिक शास्त्र या विषयातून पदवी घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयातून खेळा सोबतच त्यांना स्पर्धा परीक्षाबद्दल माहिती मिळाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक चढउतार आले. काही रिझल्ट हे कमी गुणाने  गेले, त्यामुळे यशाने थोडक्यात हुलकावणी दिल्याने ते निराश झाले. त्यातच वडिलांची रिटायरमेंट खूप जवळ आल्याने पुढे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर  होता. पण त्यांनी मनाशी हार मानायची नाही असे ठरवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. यावेळी त्यांना आईने खूप आधार दिला.

आई, वडिलांचेच लाथ मारल तिथं पाणी काढायची ताकद ठेवा हे वाक्य त्यांच्या यशाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे नाउमेद न होता आत्मविश्वासाने पुढे सरकत असताना अचानक त्यांना आजोबा समान पद्मश्री मुरलीकांत पेटकर दादा यांचा फोन आला. त्यांनी आपल्याला उद्या दिल्लीला पॅराऑलिंपिक कमिटीच्या कार्यक्रमाला जायचे असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी विमानाचा अवघ्या दोन तासाचा प्रवास उरकून ते पुणे येथून दिल्ली येथे उतरून कार्यक्रमासाठी रवाना झाले. तिथे  गेल्यावर त्यांना तिथे काही दिव्यांग खेळाडू हे नजरेस पडले. कोणाला हात नाहीत तर कोणाला पाय नाहीत तर कोणाची दृष्टी देखील नाही. तरीही ते खेळाडू अतिशय उत्साही होते. त्यांना अजिबात या गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं की आपल्याला हातपाय नाहीत किंवा आपण शरीराने दिव्यांग आहोत. ते जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरासारख्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पदके मिळवत होते. हाच कपिल यांच्या  आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. दिव्यांग खेळाडूंसाठी आपण देखील काहीतरी करू शकतो, पण त्यासाठी काय करता येईल याची त्यांनी चाचपणी केली.  हळूहळू त्यांना पॅरा ऑलिंपिक मधील छोट्या छोट्या गोष्टी कळू लागल्या. त्यामुळे ते कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या  संपर्कात असताना त्यांना तामिळनाडू येथे पॅरा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होणार असून त्यासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांची परीक्षा मार्फत निवड होणार असल्याचे समजले. या संधीचे सोने करण्याचे ठरवून ते तामिळनाडू येथे गेले, तेथील परीक्षा देखील ते उत्तीर्ण झाले. यातून त्यांना यशाची पहिली पायरी  सापडली. त्यांनी या क्षेत्रामध्ये भरपूर काम करण्याचे ठरवून स्वतःला झोकून दिले.  पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे भारत देशाचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते होते. दादांनी त्यांना संघर्षातून यश मिळवण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे “हरल्याशिवाय जिंकता येत नाही” हेच तत्त्व  आत्मसात करून त्यांनी त्यांचा प्रवास यशस्वी केला. त्यांना क्रीडा क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्राची देखील प्रचंड आवड आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी वृक्षारोपण, समुद्रकिनारे स्वच्छता, पर्यावरण जनजागृती, रक्तदान शिबिरे आणि युवकांसाठी प्रेरणादायी व्याख्याने अशा अनेक उपक्रमांमधून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 

सांगली येथील सर्वात १०० वर्ष जुन्या भारत तरुण व्यायाम मंडळाने  सामाजिक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा “सामाजिक परिवर्तनकार” २०२३–२४ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. या पुरस्काराने त्यांना मोठी शिखरे पादाक्रांत करण्याची प्रेरणा मिळाली. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून महाराष्ट्रातून त्यांची एकमेव निवड झाल्याने त्यांचे यश विस्तारले. जगभरातून या स्पर्धेसाठी केवळ १६७ जणांना निवडण्यात आले होते, त्यापैकी ते महाराष्ट्र राज्यातून एकमेव होते. सदर स्पर्धेमध्ये १४० पेक्षा जास्त देशांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये त्यांनी स्पाईक जज, ऍथलेट कंट्रोल जज, चीफ जज या महत्वपूर्ण पदांवर काम केले. त्यांच्या अंतर्गत ४८ देशातील खेळाडूंचे सर्व रेकॉर्डस तपासून खेळाडूंची कामगिरी पार पडली. या स्पर्धेत कपिल यांची वरिष्ठ तांत्रिक कामगिरी पाहून त्यांना चौथ्या दिवशी चीफ जज्ज हा केवळ माझ्या कर्तृत्वाचा सन्मान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.




भविष्यात देशासाठी खेळाडू घडवणे, गरीब आणि दुर्लक्षित वंचित युवक युवतींना व्यासपीठ देणे आणि भारताला जागतिक स्तरावर क्रीडाशक्ती बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या वडिलांची आई म्हणजे स्वर्गवासी अंजना अर्जुन मिसाळ या जर आज हयात असत्या तर तिने नक्कीच साऱ्या गावभर तिच्या नातवाच कौतुक करत फिरली असती. ती आज आमच्यात नसल्याचं खूप दुःख आहे. संपूर्ण मिसाळ परिवारात त्यांच्या आजीचा खमकेपणा स्पष्ट दिसून येतो. ती आज आमच्यात नसली तरी तिचे आशीर्वाद हे आमच्या सदैव पाठीशी आहेत. सरते शेवटी “माझं प्रत्येक यश हे  आई-वडिलांच्या त्यागाचं फलित असून त्यामुळे ते जे काही करतात, त्यातून त्यांच्या नावाने यश उजळतं.”

संघर्षाशिवाय यश मिळत नाही, आणि जिद्दीशिवाय स्वप्नं साकार होत नाहीत

या तत्वाप्रमाणे आपला जीवन प्रवास सुरू राहील असा आत्मविश्वास त्यांनी शेवट व्यक्त केला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा