अकलूज---प्रतिनिधी शकूरभाई तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
आज सकल जैन समाज अकलूज व माळशिरस तालुका, जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप, महावीर दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, दहिगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पुणे येथील HND गुरुकुल गैर विक्री संदर्भात महाराष्ट्र व संपूर्ण भारतात जैन समाज आक्रमक झाला असुन त्याच्या निषेधार्थ भारतभर मुक मोर्चा, मोटर सायकल रॅली द काढून त्या त्या जिल्ह्यातील व तालुक्यातील कलेक्टर, उप जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आज संपुर्ण भारतात 100 च्या पेक्षा जास्त ठिकाणी निदर्शन करून निवेदन देण्यात आले.
त्या अनुषंगाने त्याचाच एक भाग म्हणून सकल जैन समाजाच्या वतीने निषेध म्हणून अकलूज येथे मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती ज्या मध्ये 300 च्या वर जैन समुदायतील युवक व ज्येष्ठ व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
उप विभागीय कार्यालयासमोर जमलेल्या समुदायला संबोधीत करताना दहिगाव मंदिरचे सक्रेटरी संजय दोशी म्हणाले की HND. चा सेल डिड रद्द होई पर्यंत हा लढा चालू ठेवण्याचे आव्हान केले.
त्यानंतर बोलताना सनमती दलाचे संस्थापक मा..मिहीरभाई गांधी यांनी आपल्या समाजाची एकजूटता आपल्याला निश्चित यश देईल असे संबोधीत केले.
या मोर्च्याचे नियोजन अमित दोशी (CA), सागर फडे , योगेश गांधी, शीतल व्होरा, शिरीष फडे,मंगेश दोशी यांनी केले व आपले विचार मांडले.
मीडिया व इतर नियोजन पियुष दोशी, प्रतीक दोशी यांनी केले.
यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी सपना दोशी यांनीही आपले विचार मांडले.
उप विभागीय अधिकारी पांगारकर मॅडम यांनी सकल जैन समजाचे निवेदन स्वीकारले व सरकार पर्यंत जैन समाज्याच्या भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले
या रॅलीमध्ये बहुसंख्येने सकल जैन समाज बांधव सहभागी झाले होते.
शेवटी मंगेश दोशी यांनी गरुदेव 108 गुप्तीनंदी महाराजांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली हा लढा आपण जिंकणार आहोतच पण आपण गुरूंच्या आदेशाप्रमाणे सतर्क राहून हा लढा शेवट पर्यंत एकजूट राहून लढण्याचे आव्हान करून रॅलीची सांगता केली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा