संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी जनाब निजामभाई चांदभाई मुलाणी (वय ८२ वर्षे) यांचे आज, मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ८२ वर्षाचे होते त्यांच्या निधनाने माळीनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
निजामभाई मुलाणी हे अत्यंत धार्मिक आणि मनमिळाऊ वृत्तीचे म्हणून परिचित होते. ते 'टाईम्स ९ मराठी न्युज व महाराष्ट्र नगरी न्यूज नेटवर्क 'चे पत्रकार रियाज मुलाणी यांचे वडील होत. तर माळीनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आसमा रियाज मुलाणी यांचे सासरे होत.
त्यांच्या पश्चात, पत्नी एक मुलगा, तीन मुली,जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून माळीनगरपरिसरात शोककळा पसरली आहे.
दफन विधी आज, मंगळवार (दि. २५) रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये करण्यात आला
जियारत विधी: शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये होणार आहे.
टाईम्स ९ मराठी न्युज नेटवर्क व टाइम्स 45 न्यूज मराठी समूहाच्या वतीने जनाब निजामभाई मुलाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा