अकलूज-- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
रक्तदान श्रेष्ठदान आहे कारण ते गरजू व्यक्तींना जीवनदान देते. सिमेवर लढणारे जवान,शस्त्रक्रिया, अपघात किंवा गरोदरपणात उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितींमध्ये रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचवता येतात.रक्तदान केल्याने गरजू रुग्णांना नवीन जीवन मिळते त्यामुळे रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे पुण्यकर्म आहे असे प्रतिपादन वैदिक धर्म संस्थान आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम माळशिरसचे स्वामी सौम्यानंदाजी यांनी केले.
ते अकलूज येथे मुंबई येथील २६/११रोजी दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी व कर्मचारी यांचे स्मरणार्थ व भारतीय संविधान दिनानिमित्त अकलूज पोलीस ठाणे व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते .
शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मृतिप्रित्यार्थ मागील १७ वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूज परिवार व अकलूज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते.रक्तदान शिबिराचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अकलूज पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी केले.या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर मोफत घेण्यात आले.या शिबिरास आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक हरिभाऊ माने,गोरख डांगे,हेमलता मुळीक,कृषी अधिकारी उदय साळुंखे,राजीव बनकर,पोलीस पाटील विक्रम भोसले,रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव,बबनराव शेंडगे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवकुमार मदभावी, बबलू गाडे यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धनंजय देशमुख तर आभार माऊली मुंडफणे यांनी मानले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा