मंगरूळ ,तुळजापूर प्रतिनिधी - चांदसाहेब शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
मंगरुळ: समाजाचा आर्थिक , सामाजिक ,शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व समाजातील तरुणांच्या उज्वल भवितव्यासाठी मला धाराशिव नगर परिषद प्रभाग क्रमांक १७ अ मधून भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन धाराशिव नगर परिषद प्रभाग क्रमांक १७ काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सय्यद नादेरउल्लाह हुसैनी सर यांनी केले आहे
सय्यद नादेरउल्लाह हुसैनी सर हे उच्चशिक्षित असून त्यांना समाजाचे ज्वलंत प्रश्न ज्ञात आहेच २००६-२ ०१६सलग दोन टर्म त्यांनी नगर परिषदेत मुस्लीम समाजाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे नगर परिषदेचे बांधकाम सभापती असताना त्यांनी प्रभागात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य म्हणून करताना अनेकांना विविध आजारांचे निदान करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे नगरसेवक म्हणून प्रभागात त्यांनी पाणी, लाईट, गटार नाला स्वच्छ्ता, रस्ता दुरुस्ती, आरोग्य या क्षेत्रात सातत्याने व लक्षवेधी काम केले आहे जनतेच्या अडीअडचणी शांत, संयमीपने समजून घेउन तत्काळ सोडवण्यासाठी ते सतत कार्यशील असतात यामुळे समाजाचा जाणकार नेता म्हणून त्यांची वेगळी छबी आहे
५१ शादियांच्या माध्यमातुन गेल्या आठरा वर्षापासून सातत्याने जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील तब्बल ७०० रंजल्या गांजल्या जोडप्यांना विवाह बंधनात अडकवून त्यांच्या माता पित्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न केला आहे तसेच समाजातील गोरगरिब उच्च शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थांना आर्थिक सहाय्य , शेकडो विध्यार्थ्यांची फी, पुस्तके, प्रवेशशुल्क व इतर शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक मदत नियमितपणे दररोज चालू आहे, बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती साठी वेळोवेळी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य यामुळे अनेक युवक नोकरी व व्यवसायात स्थिर झाले आहेत अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबवण्यासाठी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला भरघोस मतांनी विजयी करावे जेणेकरून भविष्यात शासनाच्या आरोग्य, शैक्षणिक , रोजगार, वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यासाठी नगर परिषदेत पाठवावे असे आवाहन त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले
*मुस्लीम समाजातील उच्च शिक्षित, सामाजिक,शैक्षणिक , आर्थिक आरोग्य क्षेत्रांतील अभ्यासू व उत्तुंग व्यक्तिमत्व तसेच धुरंधर समाजकारणी व राजकारणी म्हणून संपुर्ण धाराशिव जिल्ह्यातील जनता त्यांच्याकडे बघत असून त्यांचा विजय म्हणजे गोरगरिब, रंजल्या गांजल्याचा विजय आहे असे खाजानगर भागातून बोलले जात आहे यामुळे त्यांचा प्रभाग क्रमांक १७अ मध्ये विजय निश्चित असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदारपणे केली जात आहे*
------------------------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा