Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

विवाहावेळी हुंडा हा मुलाकडून मिळावा का? घरकाम, स्वयंपाकीन ,मुले जन्माला घालणे ,संगोपन, इत्यादीचे ६० वर्षात १ करोड रुपये होतात तरीही हुंडाबळी का..?

 इक्बाल बाबासाहेब मुल्ला--पत्रकार 

सांगली,-मो:-8983581760



घरकामास एक कामवाली बाई ठेवल्यास तिला महिन्याला 1000 रुपये* द्यायला लागतात, "भांडी" धुवायला एक कामवाली 




बाई ठेवल्यास 1000 रुपये  लागतात, धुणे धुवायला एक कामवालीबाई ठेवल्यास 1000 रुपये.  द्यायला लागतात. घरात "स्वयंपाकीण"  ठेवल्यास महिन्याला 1500 रुपये  द्यायला लागतात. पुरुषाला स्त्री. हवी असल्यास, एक तर प्रियसी असेल तर दरवेळी गिफ्ट.  आणि महिन्याला काही रक्कम हॉटेल - कॅफे वर खर्च करावे लागते. त्याचे महिन्याला "2000 रुपये" द्यावे लागतात. आणि एखाद्याला विवाहबाह्य. संबंध ठेवायचे असल्यास कॉलगर्ल अथवा lवेश्याकडे. जायचे असेल तर दररोज 500 ते 2000 रुपये दररोज द्यावे लागतील, हे एक कटू सत्य व  हेच वास्तव आहे. विवाहानंतर मुलगी  "नैसर्गिकरित्या" स्त्री मूल जन्माला घालते. परंतु  काही कारणाने मुलं होत नसेल तर टेस्टट्यूबबेबी* च्या माध्यमातून 2 ते 5 लाख. रुपये खर्च करावे लागतात.आणि मुलगा "दत्तक" घ्यायचा झाल्यास 5 लाखापर्यंत खर्च करावा लागतो.

तात्पर्य हेच आहे की जर हिच मुलगी लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरात मोफत - फुकट घरकाम. करते, स्वयंपाक करते, धुणी धुते, भांडी धुते, टॉयलेट. साफ करते,जेथे दररोज 2000 रुपये  स्त्रीशय्या करण्यासाठी लागतात तेथे ही स्त्री पुरुषांना दररोज आणि आयुष्यभर "मोफत" फ्री  सुख देते, मुलांना जन्मही देते,त्यांचे संगोपन.  करते. एक स्त्री 60 वर्ष नवऱ्यासोबत राहिली अर्थात *lसासरी लोकांसोबत राहिली तर 60 वर्षात ती नवऱ्याचे "1 कोटी रुपये" वाचवते..फायदा करते. याचा विचार कधी पुरुषांना आला आहे का ?? पुरुष स्त्रीला "कस्पटासमान" समजत असेल तर स्त्रियांचे हे बलिदान  त्याग याला काहीच "किंमत" उरत नाही.

आपली सून घराचा, नवऱ्याचा म्हातारी होईपर्यंत अर्थात  वयाच्या 60 वर्षापर्यंत  "एक कोटी" रुपयाचा फायदा करत असेल तर पूरूषांनी - सासरच्या मंडळींनी त्या मुलीला गुलाबाच्या फुलाप्रमाणे. जपायला हवे. अशी "सर्वोत्तम" सून मिळत असेल त्या मुलीकडून सासरच्या लोकांनी हुंडा. का घ्यावा ??? हुंड्यासाठी तिचे मारहाण करत  तिचे "हाल" का करावे ?? तिला आत्महत्या  करण्यासाठी प्रवृत्त का करावे ?? तिचा खून का करावा ?? तिला हुंडाबळी साठी प्रवृत्त.का करावे ???  जर एखादी तरुणी नवऱ्याच्या घरात "1 कोटी" वाचवत असेल तर विवाहात मुलीने हुंडा द्यायची "प्रथा बंद व्हायला नको का ?? गेल्या काही वर्षात उत्तरप्रदेश मध्ये 2138 हत्या ,बिहारमध्ये 1057, मध्यप्रदेश मध्ये 518 ,आणि राजस्थान मध्ये 451, दिल्लीमध्ये 131 हत्या झाल्या.महाराष्ट्रात देखील याचे प्रमाण कमी - अधिक प्रमाणात आहेच. 

मुलींची उपयुक्तता   पाहता आगामी काळात विवाह करायचा असेल तर तरुणांनी त्या मुलीला हुंडा द्यायला हवा असे म्हंटले तर चालेल का ?? 60 वर्षातील तिचे कष्ट -त्याग - कार्य डोळ्यासमोर ठेवत त्या मुलीचा "सन्मान" व्हायला हवा. भविष्यात  मुलीलाच हुंडा देण्याची प्रथा  सुरु व्हावी. जेणेकरून मुलीच्या वडिलांना  देखील लग्नासाठी कर्ज* काढावे लागणार नाही, आर्थिक त्रास सोसावा लागणार नाही. आणि भविष्यात त्यामाध्यमातून स्त्रीभ्रूण हत्याही.   रोखण्यात येतील.

आज महिलांवर होणाऱ्या या अन्यायाची होणारा "अत्याचार" याचा बिमोड व्हायलाच हवा.

ज्या मुलीने गेले 20 वर्षांपूर्वी जिथे जन्म घेतला ते मायेचे कुटुंब आणी ज्यांनी जन्म   दिला ते आई -वडील* ..या सर्वांचा त्याग करून नवऱ्याकडे - सासरकडे यायचे..! आणि हुंडाबळी ची "शिकार" व्हायचे..! मनावर उमटणारे "रक्तरंजित ओरखडे*  मुलीने किती सहन करायचे ?? हे कुठेतरी थांबायला हवे??? एका स्त्रीच्या अंतरंगातून, स्त्रीला - महिलेला - युवतीला -तरुणीला "*न्याय*" देण्यासाठी तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा आरसा. आज मी सादर करत आहे. याचे मनःपूर्वक आत्मचिंतन व्हायला हवे. "फुल ना फुलांची पाकळी" म्हणून तरुणींना वराकडून प्रेमाची भेट मिळेल का ?? हुंडा नव्हे तर "पैशाचा हंडा" भेटेल का ? सासरच्या लोकांकडून प्रेमाची lशिदोरी  मिळेल का ??  

मुस्लिम समाजात विवाहावेळी नवऱ्यामुलाकडून रोख रक्कम - सोने - चांदीl  यांचे दागिने असा मेहर स्वरूपात भेट दिली जाते. अन्य काही समाजात  विवाहावेळी मुलीच्या वडिलांना पैसे द्यावे लागतात. सर्व समाजात मुलींचा सन्मान राखण्यासाठी विवाहात मुलींनाच हुंडा अर्थात "मान -सन्मान"  देण्याची "प्रथा" सुरु व्हावी ही अपेक्षा आहे.

 इकबाल  बाबासाहेब  मुल्ला 

( पत्रकार )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

मोबाईल - 8983581760

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा