सहसंपादक-- डॉ. संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-९९२२ ४१९ १५९
खेळामध्ये सातत्य ठेवल्यास निश्चित यश मिळतेच तसेच यामध्ये देखील आपले करिअर यशस्वी करता येते असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे क्रीडा विभाग आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त) खडकी पुणे यांचे क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ते ९ नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हॉकी स्टेडियम येथे आंतर विभागीय हॉकी स्पर्धा मुले-मुली चे उद्घाटन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्ष कृष्णकुमार गोयल पुढे म्हणाले, खेळामध्ये खेळाडूंनी सातत्य ठेवणे खूप आवश्यक असून सातत्याने केलेले प्रयत्न हे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवून देते. त्यामुळे युवापिढीने खेळाचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.
आंतर विभागीय हॉकी स्पर्धेसाठी पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालया तील संघ सहभागी झाले आहेत अशी माहिती क्रीडा संचालक डॉ. महेश बेंडभर यांनी दिली.
यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थे, काशिनाथ देवधर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा संचालक सुदाम शेळके, महाराष्ट्र हॉकी फेडरेशन चे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. मनोज भोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य रमेश गायकवाड, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव अमेय काळे तसेच सदस्य दिनेश कराड हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश कोल्हे तर आभार डॉ. सुदाम शेळके यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा