मुख्यसंपादक -- हुसेन मुलाणी. टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी धडाकेबाज कामगिरी असुन ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
दिनांक ०१/११/२०२५ रोजी सायंकाळी ०७:४५ वा. सुमारास सोलापूर शहरातील आर.टी.ओ. ऑफिस रोड, गणेश नगर बस स्टॉप जवळील समर्थ ज्वेलर्स दुकाना समोर तीन अज्ञात इसम निळया रंगाचे मोटार सायकलवर आले. त्यापैकी एक इसम हा दुकानाचे बाहेरच मोटार सायकलवर बसून होता व उर्वरीत दोन इसम समर्थ ज्वेलर्स दुकानात येवून कोयता व पिस्टलचा धाक दाखवून दुकानाचे मालकास * सोन्याचे दागिने बैंगेत भर अशी दमदाटी करून दोन्ही इसमापैकी काळया रंगाचे जॅकेट घातलेल्या इसमाने त्याचे हातातील कोयत्याने दुकानातील काचेचे काऊंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकान मालक दिपक दिगंबर वेदपाठक यांनी व दुकानातील कामगारांनी आरडा-ओरड केल्याने सदरचे इसम हे निळ्या रंगाचे मोटार सायकलवरून पळून गेले. त्यावरून सदर घटने बाबत विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं.५१७/२०२५ मा.न्या. संहिता कलम ३०९ (४). ६२. ३५१(२) (३), ३२४(३) ३(५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये दिनांक ०२/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर दरोड्याची घटना गंभीर स्वरूपाची असल्याने तो गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.
वरील नमुद दरोड्याची घटना घडल्याने, नमुद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन, श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 07 तपास पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून नमूद घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी. सी. टी. व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्याच्या व तांत्रीक विश्लेषण करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे दत्तात्रय काळे व पोसई मुकेश गायकवाड, यांनी गुन्ह्याचे घटनास्थळा पासून सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे 125 सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपीची ओळख पटक्त असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी यांना गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाली की आर.टी.जो. ऑफिस रोड वरील दिनांक 01/11/2025 रोजी समर्थ ज्वेलर्स या दुकानात जबरी चोरी करणारे 03 इसम हे बजाज प्लेटिना कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम. एच. 13 ई. ए. 2578 घेवून यतीमखाना जवळील मोकळया मैदानात थांबले आहेत.
वरील प्रमाणे प्राप्त गोपनिय माहितीची खात्री करून गुन्हे शाखेकडील तपास पथके व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून बजाज प्लेंटीना मोटार सायकलवरील 03 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विचारपूस करता त्यांची नावे (1) साहिल दशशरण गायकवाड, वय-20 वर्षे, व्यवसाय बेकार, रा. भैरू वस्ती, लिमयेवाडी, सोलापूर (2) समर्थ समीर गायकवाड, रा. मेरू वस्ती, सुशिल मराठी शाळे जवळ, सोलापूर, (३) सार्थक दशरथ गायकवाड, रा. 2 नंबर झोपडपट्टी, विठ्ठल मंदिर जवळ, सोलापूर असे असल्याचे सांगितले. पुढील तपासामध्ये साहील दशरथ गायकवाड याचेकडून अशी माहिती मिळाली की, दिनांक 01/11/2025 रोजी दुपारी 03.30 चे सुमारास साहील व त्याचे मित्र नामे (1) अजिंक्य चव्हाण, रा.वारजे माळवाडी, पुणे, (२) विशाल जाधव, रा. तुळजापूर, वि. पाराशिय
(3) समर्थ समिर गायकवाड (4) सार्थक दशरथ गायकवाड (5) अनिकेत पांडुरंग गायकवाड सर्व राहणार सोलापूर व एक विधिसंधर्षीत बालक यांनी दमाणी नगर मधील गोल्ड जिम समोरील मैदानात एकत्र जमले. त्या ठिकाणी वरील सर्वांनी आरटीओ ऑफीस जवळ समर्थ ज्वेलर्स नावाचे दुकान लुटण्याचा कट केला. त्यावेळी अजिंक्य चव्हाण याने त्याचेकडे पिस्टल व 03 काडतुसे व साहील गायकवाड याने त्याचेकडील लोखंडी कोयता असे शस्त्रासह एकत्र जमून यातील आरोपी अजिंक्य चव्हाण याचे ताब्यातील विना नंबरप्लेटची पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडीची ओळख पटू नये व पोलीसांची दिशाभूल व्हावी यासाठी नमूद गाडीस निळया पेंट स्प्रेने रंगविले.
त्यानंतर नमूद निळया अॅक्टीव्हा गाडीवर अजिंक्य चव्हाण, विशाल जाधव व साहील गायकवाड हे तसेच समर्थ गायकवाड, सार्थक गायकवाड व विधी संधर्षीत बालक असे प्लॅटिना मोटार सायकलवरून आर.टो.ओ. रोड येथील समर्थ ज्वेलर्स शॉपजवळ आले. त्यावेळी अजिंक्य चव्हाण व साहील गायकवाड हे तोंडास मास्क बांधून समर्थ ज्वेलर्स दुकानात शिरले व विशाल जाधव हा दुकानाचे बाहेर गाडीवरच यांबून राहिला. तसेच उर्वरीत तिघे हे सोन्याचे दागिने लुटताना काही गडबड झाल्यास त्यांना मदत करण्यासाठी समर्थ ज्वेलर्स दुकानाचे आसपासच थांबुन राहिले.
त्यानंतर अजिंक्य चव्हाण व साहील गायकवाड यांनी समर्थ ज्वेलर्समध्ये प्रवेश करून, अजिंक्य चव्हाण याने त्याचे हातातील पिस्टलचा धाक दाखवून तसेच साहील गायकवाड याने दुकान मालकाकडे बैंग टाकून सोन्याचे दागिने बॅगेत भर अशी दमदाटी करून हातातील कोयत्याने दुकानातील काचेचे काऊंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकान मालक यांनी चोर आले म्हणून जोर-जोरात आरडा ओरड केल्याने साहील व अजिंक्य हे दोघे घाबरून निळ्या रंगाचे मोटार सायकलवरून पळून गेले. त्यानंतर ते सर्वजण एकत्रीत लिमयेवाडी येथील समर्थ गायकवाड यांचे घरा जवळील बोळात निळया अॅक्टीव्हा गाडीचा रंग पेट्रोलने धुतला. त्याप्रमाणे नमूद इसमांना ताब्यात घेवून त्यांचे अंगझडतीत लोखंडी कोयता, बजाज प्लॅटीना कंपनीची मोटर सायकल व मोबाईल फोन जप्त करणेत आले आहेत. तसेच नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे अनिकेत पांडुरंग गायकवाड याचेकडून काळया रंगाची अॅक्टीव्हा मोटर सायकल जप्त करण्यात येवून त्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नमूद गुन्ह्यातील विधीसंधर्षीत बालक यास त्याचे नातेवाईका सह विजापूर नाका पोलीस ठाणेस हजर राहणेस समज दिली.
त्याचप्रमाणे यातील आरोपी नामे (1) समर्थ गायकवाड व अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी होटगी रोड, सोलापूर येथील चौधरी फिर्लांग सेंटर (पेट्रोल पंप) येथे पिस्टल व चाकूचा धाक दाखवून सुमारे 39,000/- रूपये जबरीने चोरले होते. त्याबाबत वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गु.र.नं.494/2025 भा.न्या.सं.क.303 (2) अन्वये दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री. गौहर हसन पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय), श्री. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, स.पो.नि. शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे व दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार व सायबर कडील पानीस अंमलदार यांनी केली आहे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा