Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

टचस्क्रीन मोबाईलच्या प्रकाशात हरवलीय तरुण पिढी --डॉ. प्रकाश पांढरपिसे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


विद्या प्रतिष्ठान माध्यमिक शाळा, बारामती येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेमध्ये + पहिले पुष्प “मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आजची तरुणाई”या विषयावर खडकी शिक्षण संस्थेचे, टिकाराम जगन्नाथ (स्वायत्त) महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी अत्यंत विचारप्रवर्तक, प्रेरणादायी आणि विध्यार्थ्यांच्या हृदयाला भिडणारं ओघवत्या शैलीत व्याख्यान दिलं.

आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत बोलताना डॉ. पांढरमिसे म्हणाले “मोबाईलने जग आपल्या हातात आणलं आहे; पण त्याचबरोबर त्याने आपल्याला स्वतःपासून दूर नेलं आहे. मोबाईलचा स्क्रीन उजळतो, पण त्यामागे अनेक तरुणांचे आयुष्य अंधारात जात आहे. आजचा तरुण संवाद हरवून, आत्मसंवाद विसरून फक्त नोटिफिकेशनच्या  आभासी दुनियेत वावरतो आहे.”

      डॉ. पांढरमिसे पुढे सांगितले की, “टचस्क्रीनच्या या दुनियेत मानवी स्पर्श हरवला आहे. प्रत्यक्ष संवाद, खेळ, वाचन, कुटुंबीयांशी संवाद या सगळ्यांची जागा मोबाईलने घेतली आहे. आपण नुसते तंत्रज्ञानाचे वापरकर्ते राहिलो नाही, तर त्याचे गुलाम झालो आहोत.” यांनी आजच्या तरुणाईला भावनिक शब्दांत आवाहन केलं  “मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आजची तरुणाई जागी होऊ द्या. मोबाईलवर नियंत्रण ठेवा, त्याला तुमचं नियंत्रण घेऊ देऊ नका. जीवनात स्क्रीन नाही, स्वप्नं आणि संकल्प हवे आहेत.”

          डॉ. पांढरमिसे यांनी मोबाईलचा मर्यादित वापर, वेळेचं नियोजन, आत्मसंयम, आणि वाचनाची सवय याविषयी मार्गदर्शन केलं. त्यांनी कर्तबगार व कर्तृत्ववान व मानवतेला प्रेरणादायी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  डॉ. एपीजे अब्दुल कलाम या युगपुरुषांची उदाहरणे देत स्पष्ट केलं की, “यश मिळवायचं असेल तर फक्त टचस्क्रीन नव्हे, तर ‘लाईफस्क्रीन’ सक्रिय करा.मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश क्षणिक आहे, पण विचारांचा प्रकाश शाश्वत असतो.” “जागे व्हा कारण जीवनाचा टचस्क्रीन तुमच्या हातातच आहे.या प्रेरणादायी व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित सर्वांनाच हा विषय अंतर्मुख करणारा वाटला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत विचारांची नवी ज्योत प्रज्वलित झाली.

        कार्यक्रमाचं प्रास्ताविक सूत्रसंचालन केंद्र कार्यवाह श्री. हेमंत धुमाळ यांनी केलं,सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन मुख्याध्यापक श्री. प्रकाश यादव व पाहुण्यांच्या हस्ते केले. स्वागत गीताने विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत करत कार्यक्रमास सुरवात केली.या व्याख्यानाने विद्यार्थ्यांच्या मनात एक नवा विचार, जबाबदारीची जाणीव आणि मोबाईलच्या वापराबद्दल सजगतेचा प्रकाश पेरला. शेवटी सभागृहात घुमलेले हे शब्द सर्वांच्या मनात कायमचे घर करून गेले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक श्री. नानासाहेब रकटे यांनी केले.

या कार्यकमासाठी उपमुख्याध्यापक श्री. प्रकाश कोरे, कुंभार सर, दोशी सर, घोरपडे सर, लोंढे सर, इतर शिक्षक, शिक्षिका व मोठ्यासंख्येने विध्यार्थी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा