*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
: मालोजीराजे औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृह अधीक्षकाचे तीन महिन्यांचे थकीत वेतन काढून दिल्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख लिपिकाला सोमवारी (दि. २४) दुपारी रंगेहाथ पकडले.
अनमोल शिवाजी शिंगे (वय ५३, रा. दुसरा माळा, तापी गृहनिर्माण संस्था, राजवेलीनगर, इंदापूर), असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भातील माहिती अशी की, मालोजीराजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृह अधीक्षकांचा यावर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा थकीत पगार काढून देण्याच्या मोबदल्यात आणि पुढील काळात सहकार्य करण्यासाठी आरोपी वारंवार तीन हजार रुपयांची लाच मागत होता.
यामुळे वसतिगृह अधीक्षकांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तक्रारदाराचे थकीत वेतन काढून दिल्याचा मोबदला व पुढील काळात सहकार्य करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाच मागण्या स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सोमवारी (दि. २४) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई करत रंगेहाथ पकडले.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा