Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

लहान मुलांच्या सृजनशीलतेला उमलवणारा प्रेरणादायी उपक्रम फिनिक्स स्कूल मध्ये.

 

नूरजहाँ शेख --उपसंपादक

टाइम्स 45 न्युज मराठी




शाळा म्हणजे केवळ गणित, भाषा वा विज्ञान शिकविणारी जागा नाही, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडविणारी एक जिवंत संस्कृती आहे. येथे प्रत्येक उपक्रम हा मुलांच्या मनाच्या विकासासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. अशा अनेक उपक्रमांपैकी छापडीचे घर बनविणे हा उपक्रम लहान मुलांच्या सृजनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि आत्मविश्वासाला पोषक असल्याने  हा उपक्रम शाळेत घेण्यात आला. या प्रसंगी बोलताना शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख म्हणाल्या  छापड्या,झाडांची पाने ,फुले रंगीत कागद, गम, काड्या, कात्री हे साहित्य हातात घेतले की मुलांच्या मनात नवनिर्मितीचे रंग उजळतात सुंदर निर्मिती घडवता येते,  कल्पनांना आकार मिळतो, घर कसे दिसावे?

छप्पर कसे बनवायचे?

खिडक्या किती?

भिंती कोणत्या रंगाच्या?




हे निर्णय घेण्यातून त्यांची निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि नियोजन कौशल्य विकसित होते. प्रत्येक टप्प्यावर ते विचार करतात, पुन्हा प्रयत्न करतात आणि हळूहळू त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष आकार मिळतो.

हे काम करताना मुलांचे हात व्यस्त असतात, पण त्यांचे मन अधिकच सक्रिय होते. भिंती रंगवताना किंवा काड्यांनी फाटक तयार करताना मुलांच्या हात-विचार समन्वयाची सुंदर सांगड घडते. ही कौशल्ये त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडते

नवनिर्मितीची आवड निर्माण होते.



एक छोटीशी निर्मिती पूर्ण झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारा तेजस्वी आनंद हा अमूल्य असतो. “हे घर मी बनवलं!” हा अभिमान त्यांच्या मनात नवनिर्मितीची ज्योत प्रज्वलित करतो. या आनंदातूनच मुलांमध्ये भविष्याच्या मोठ्या कल्पनांना घडविण्याची ताकद निर्माण होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा